शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या घरापुढे वाजणार ‘नाशिक ढोल’

By admin | Updated: March 5, 2017 01:11 IST

नाशिक : घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेने आता थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन ‘नाशिक ढोल’ वाजविण्याचे ठरविले आहे.

 नाशिक : घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेने आता थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन ‘नाशिक ढोल’ वाजविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या सोमवार (दि.६) पासून कुणाच्या घरासमोर ढोल वाजताना दिसले तर तो मनपाचा थकबाकीदार असल्याचे समजा. आपली इभ्रत वेशीवर टांगली जाऊ नये, यासाठी आता थकबाकीदार वसुली पथकाला कितपत प्रतिसाद देतात, हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना घरपट्टी व पाणीपट्टीची १०० टक्के वसुली करण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने गेल्या २ मार्चपासून सहाही विभागात प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण १८ वसुली पथके स्थापन केली आहेत. सदर पथकांकडून वसुलीचे प्रयत्न सुरू असले तरी बड्या थकबाकीदारांकडून अजूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने आता बड्या थकबाकीदारांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडून थकबाकी वसुलीसाठी थेट घरासमोरच नाशिक ढोल वाजवून लक्ष वेधले जाणार आहे. येत्या सोमवार (दि.६) पासून महापालिकेमार्फत ढोल पथकाच्या साहाय्याने ही वसुलीची कार्यवाही केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पोलिसांकडून घेतल्या जात आहेत. सुमारे ३२०० थकबाकीदार असून, त्यात टॉप टेन असलेल्या बड्या थकबाकीदारांकडे लाखोची थकबाकी प्रलंबित आहे. यापूर्वी बड्या थकबाकीदारांना मनपाने वारंवार नोटिसा बजावूनही त्यांच्याकडून भरणा झालेला नाही, तर काही थकबाकीदारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता शासनानेच वसुलीचे आदेश दिल्याने महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. बड्या थकबाकीदारांमध्ये काही नामवंत बिल्डर्स, शिक्षणसंस्था, धार्मिक व सामाजिक संस्थांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)