शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

नाशिक क्राईम ब्रान्च : श्रीरामपूरमधून बांधल्या 'त्या’ दोघा लूटारुंच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:11 IST

दोघा भामट्यांकडून सुमारे तीन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

ठळक मुद्देतीन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगतदोघा भामट्यांना तिस-या डोळ्याने टिपलेवृद्ध महिलांचे दागिने घेत घरातून पोबारा करत होते

नाशिक : वीजमीटर रिडिंग व जनगणनेचा बहाणा करून महापालिका व महावितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत सहजरीत्या घरामध्ये प्रवेश करून दागिन्यांची लूट करणा-या त्या दोघा लुटारूंच्या मुसक्या बांधण्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. दोघा भामट्यांकडून सुमारे तीन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आठवडाभरापूर्वी पंचवटी, म्हसरूळ, उपनगर परिसरातील दोघा लुटारूंनी जनगणना विभाग, महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगून वीज बिल भरणा, वायरिंग तपासणीची कारणे दाखवत घरांमध्ये प्रवेश मिळवून घरातील वृद्ध महिलांना विविध प्रश्नांमध्ये गुरफटून ठेवत त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास दोघे प्रवृत्त करत होते. यासाठी हे दोघे भामटे तुळशीची पाने, पाणी हातात ठेवून काही मंत्रजाप करत आजारपण दूर करण्याच्या भुलथापाही देत होते. यावेळी वृद्ध महिलांनी दागिने काढून ठेवल्यास नजर चुकवून ते दागिने घेत घरातून पोबारा करत होते.

याबाबत वरील उपनगरीय भागांमध्ये लागोपाठ अशाच पद्धतीने दागिने लुटल्याच्या घटना घडल्याने नागरिक धास्तावले होते. अशाच एका भागात अपार्टमेंटच्या परिसरात दोघे भामटे पोहचले असता, त्यांचे चेहरे तिस-या डोळ्याने टिपले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, फुटेजमधील संशयित श्रीरामपूरमधील असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संजय ताजणे यांना मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिका-यांना माहिती देत पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, नितीन भालेराव, परमेश्वर दराडे, मधुकर साबळे यांचे पथक श्रीरामपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.--तीन दिवसांचा ठोकला तळगुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक श्रीरामपूर भागात तीन दिवस तळ ठोकून होते. श्रीरामपूर तालुक्यात शोधमोहीम राबविताना नखाते यांनी दिलेल्या निर्देशानुसार पथकाने संशयास्पद ठिकाणी चाचपणी सुरू केली. यावेळी बेलापूर रस्त्यावरून पडेगाव येथून शंकर रामदास लाड याला ताब्यात घेण्यास पथकाला यश आले. त्यानंतर बोंबले वस्ती टिळकनगर, श्रीरामपूरमधून साथीदार संतोष एकनाथ वायकर यास अटक केली. यांनी उपनगर, पंचवटी परिसरांत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे करीत आहेत.

टॅग्स :Robberyदरोडाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक