शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर भाकपाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:36 IST

बि. डी. भालेकर मैदानावरून दुपारी एक वाजता रखरखत्या उन्हात निघालेला मोर्चा शालीमार चौक, टिळकपथ, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी तो अडविला यावेळी जिल्हाधिका-यांची शिष्टमंडळान े भेट घेवून निवेदन सादर केले.

ठळक मुद्देस्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतक-यांना लागू करा शेतक-यांना संपुर्ण कर्जमुक्ती द्या

नाशिक : शेतकरी, कामगार तसेच असंघटीत कामगारांच्या प्रश्नांवर भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच मोर्चामुळे शहरातील वाहतुक व्यवस्थाही विस्कळीत झाली. सरकारने त्वरीत मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.येथील बि. डी. भालेकर मैदानावरून दुपारी एक वाजता रखरखत्या उन्हात निघालेला मोर्चा शालीमार चौक, टिळकपथ, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी तो अडविला यावेळी जिल्हाधिका-यांची शिष्टमंडळान े भेट घेवून निवेदन सादर केले. त्यात शेतक-यांना संपुर्ण कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतक-यांना लागू करा, शेतकरी, शेतमजुरांना ५८ वर्षानंतर पाच हजार रूपये वृद्धापकाळी दरमहा द्या, शेतक-यांच्या कृषीपंपाचे बील माफ करा, कसत असलेल्या वनजमिनी व गायरान जमिनी नावावर करा, विविध कार्यकारी सोसायट्यांना राज्य सहकारी बॅ ँकेने थेट कर्जपुरवठा करावा, मनरेगा अंतर्गत शेतकºयांच्या बांधावरील कामाचा समावेश राहयोत करा, केंद्रीेय कामगार संघटनांच्या मागणीनुसार असंघटीत कामगार आशा, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मनरेगा, ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी कामगार, घंटागाडी, सफाई कामगार, अंशकालीन स्त्री परिचर यांना १८ हजार रूपये किमान वेतन द्या, भिमा कोरेगावच्या दंगलीचा कट रचनाने संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करा, घरकाम मोलकरीन, बांधकाम कामगार मंडळासाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नेमणूक करा, घरकाम मंडळासाठी आर्थिक तरतूद करावी, महिला, मुलींवर अत्याचार करणाºयांवर कारवाई करा, नाशिक महापालिकेने शेतकरी व नागरिकांवर लागू केलेली करवाढ रद्द करा यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात कॉ. राजू देसले, अ‍ॅड. सुभाष लांडे, कॉ. तुकाराम भस्मे, स्मिता पानसरे, शांताराम वाळुंज, भास्करराव शिंदे, हिरालाल परदेशी, माणिक सुर्यवंशी, अमृत महाजन, कारभारी उगले, बन्सी सातपुते यांच्यासह नाशिक विभागातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक