शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

नाशिकमध्ये कोरोनाचा लोकप्रतिनिधींना विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:11 IST

शहरात कोरोनाचे संकट वाढत असतानाच लोकप्रतिनिधीही त्याच्या विळख्यात सापडत आहे. नगरसेवक, आमदार आणि खासदारांना त्याची लागण होत आहे.

ठळक मुद्देफरांदे यांना संसर्ग : हेमंत गोडसे, सरोज आहिरे, राहुल आहेर, माणिकराव कोकाटे मुक्त

नाशिक : शहरात कोरोनाचे संकट वाढत असतानाच लोकप्रतिनिधीही त्याच्या विळख्यात सापडत आहे. नगरसेवक, आमदार आणि खासदारांना त्याची लागण होत आहे.रविवारी (दि. १३) मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले असले तरी नागरिक बाहेर पडतात. परंतु लोकप्रतिनिधींना तर जनसंपर्क अत्यावश्यक ठरत आहे. भेटण्यास येणारे नागरिक आणि सध्या कोरोनामुळे अनेकांना उपचारासाठी मदत करावी लागत आहे.काही लोकप्रतिनिधींना कामानिमित्तान मुंबई-पुण्यासही जावे लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर वाढता संचार आणि संपर्क यामुळे मात्र त्यांचा जीव धोक्यात असतो. कितीही आरोग्य नियमांचे पालन केले तरी संंबंधिताना धोका असतोच.मध्यंतरी देवळाली येथील राष्टÑवादीच्या आमदार सरोज आहिरे यांना संसर्ग झाला होता. त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यानंतर चांदवड-देवळाचे आमदार राहुल आहेर, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले, तर दुसरीकडे खासदार हेमंत गोडसेदेखील पॉझिटिव्ह आढळले होते. ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. हे सर्व जण पुन्हा जनसेवेसाठी दाखल झाले आहेत.दरम्यान, आता मध्य नाशिकच्या आमदार आमदार देवयानी फरांदेदेखील बाधीत झाल्या आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमास त्या गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी त्यांच्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. फरांदे यांनी स्वत:च सोशल मीडियावर माहिती देऊन त्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. फरांदे यांनी यापूर्वी दोन ते तीन वेळा चाचण्या केल्या होत्या. त्यात त्या निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र, संपर्कात आलेल्या सर्वांनीच चाचण्या करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहेत. याशिवाय शहरातील अनेक नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनादेखील संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात काहीजण कोरोनामुक्त झाले आहेत, तर काहीजण अद्यापही उपचार घेत आहेत.पालकमंत्री भुजबळ होमक्वारंटाइनराज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबई येथील कार्यालय एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तर दक्षतेचा भाग म्हणून भुजबळ हे स्वत: होमक्वारंटाइन झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदेHemant Godseहेमंत गोडसेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेRahul Aherराहुल आहेरcorona virusकोरोना वायरस बातम्या