शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: नाशिकमध्ये रस्त्यांवर ‘कोंडी’; मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्री शहरात

By अझहर शेख | Updated: July 15, 2023 13:18 IST

Nashik: शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शनिवारी (दि.१५) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून नागरिक जुना गंगापुरनाका येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर हा कार्यक्रम पार पडत आहे.

- अझहर शेखनाशिक: शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शनिवारी (दि.१५) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून नागरिक जुना गंगापुरनाका येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर हा कार्यक्रम पार पडत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्री नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.  यामुळे शहरात व्हीव्हीआयपी व्यक्तींची आज रेलचेल पहावयास मिळत आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे; मात्र कार्यक्रमस्थळाच्या दिशेने जाणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी सकाळी साडेअकरा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान पहावयास मिळाली. 

शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, उर्जा मंत्री उदय सामंत, तसेच विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती आहे.

या कार्यक्रमासाठी शासकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. तसेच ५०० एसटी बसेस, १०० सिटी लिंकच्या बसेस, २ हजार मोटारींद्वारे नागरिक जिल्हाभरातून याठिकाणी दाखल होत आहे, असा अंदाज शहर वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेने वर्तविला आहे. यामुळे वाहतुक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचनाही गुरुवारी (दि.१३) जाहिर केली होती. या अधिसूचनेनुसार शहरात शनिवारी डोंगरे वसतीगृह मैदानाकडे जाणाऱ्या गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौक, चोपडा लॉन्स-हनुमानवाडी लिंकरोड, कॅनडा कॉर्नर, पंडित कॉलनी (ठक्कर बंगला) या पॉइंटवर बॅरेकेडिंग करण्यात आले आहेत. तसेच या मार्गावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत हा बदल कायम राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने जरी वळविली असली तरीदेखील वाहतुक कोंडी सकाळी बघावयास मिळाली. मॅरेथॉनचौकापासून वाहतुकीला डाव्या बाजूला वळण देण्यात आले असून पंडित कॉलनीतील मनपाच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोरून वाहतूक शरणपुररोडच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. हा रस्ता अरूंद स्वरुपाचा असल्याने याठिकाणी वाहतुक कोंडी बघावयास मिळत आहे. तसेच गंगापुरनाका सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॅनडा कॉर्नर व्ही.एन.नाइक कॉलेजच्या अलिकडे बॅरेकेडिंग करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कॉलेजरोडने पुढे मार्गस्थ होत आहे. या दोन्ही रस्त्यांवर अतिरिक्त वाहनांचा ताण निर्माण होताना दिसत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक