नाशिक : चार दिवसांपूर्वीच थेट ४० वर पोहोचलेल्या पाऱ्याने संरक्षणासाठी विविध साधनांचा उपाय करावा लागला असताना त्याच क्रमाने आता उतरलेल्या तपमानाने नाशिककरांना थोडा दिलासा दिला आहे. शनिवारी राज्यातील इतर जिल्'ांप्रमाणेच नाशिक जिल्'ातील मालेगाव तालुक्यातही पाऱ्याने चाळिशी ओलांडली असताना शहरातील पारा ३५ वर स्थिरावल्याने नाशिककरांना उन्हापासून थोडा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून अवकाळीचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी काही दिवसांपासून सुरू झालेल्या उकाड्यामुळे ते हैरान झाले आहेत. दुपारच्या वेळी लागणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे रस्ते सुनसान होत असून, तपमानाचा पारा अद्यापही ३५ च्या वर असल्याने वातावरणातील उष्णता दुपारच्या सुमारास अस' होत आहे. मागील शनिवारपासून ३८ अंशांवर पोहोचलेल्या पाऱ्याने खऱ्या अर्थाने वैशाख वणवा काय असतो हे दाखवून दिले. पाच दिवसांत तपमानाचा पारा २३ पासून थेट ३८ वर पोहोचला होता. त्यानंतर दोनच दिवसांत नाशिकमधील तपमानाचा पारा ४१ वर पोहोचला. मालेगावचे तपमान तर ४२च्या पुढे गेले होते. दुपारच्या वेळेस वाढलेल्या उष्म्यामुळे शरणपूररोड, गंगापूररोड, शिवाजीरोड, मेनरोड यांसारखे गजबजलेले रस्तेही निर्मनुष्य झाले होते. जे काही मोजके नागरिक बाहेर पडलेले दिसत होते त्यांनीही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, गॉगल आणि पंचा यांचा आधार घेतला होता. महिलांनी सनकोट आणि स्कार्फचा वापर केला.
राज्याच्या तुलनेत नाशिक थंडच
By admin | Updated: April 26, 2015 00:41 IST