शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरवासीयांची मक्याच्या रोटीतून सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:24 IST

केंद्र सरकारने आधारभूत किमतीत चालू वर्षी मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन खरेदी केलेला मका रेशनमधून एक रुपया किलो दराने विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ९६ हजार क्विंटल मका शेतक-यांकडून खरेदी करण्यात आल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरवठा

ठळक मुद्देखरेदी थांबली : नऊ तालुक्यांना मात्र पुरवठा गेल्या तीन महिन्यांत ९६ हजार क्विंटल मका वाटप

नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून उत्तर भारतीयांप्रमाणे दर महिन्याला रेशनमधून मिळणाऱ्या मक्याची रोटी खाणा-या शहरवासीयांची एप्रिलपासून सुटका करण्यात आली असून, नाशिकबरोबरच त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांनाही त्यातून वगळण्याचा निर्णय पुरवठा खात्याने घेतला आहे. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या मक्याची शासनाने अचानक खरेदी बंद केल्यामुळे जितका मका खरेदी केला त्याची गेल्या चार महिन्यांत रेशनमधून विक्री करण्यात आली आहे. आता जेमतेम मका उरलेला असल्यामुळे मे महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यातच मका बंद करण्यात येणार आहे.केंद्र सरकारने आधारभूत किमतीत चालू वर्षी मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन खरेदी केलेला मका रेशनमधून एक रुपया किलो दराने विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ९६ हजार क्विंटल मका शेतक-यांकडून खरेदी करण्यात आल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरवठा विभागाने नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा चार किलोप्रमाणे वाटप सुरू केले. डिसेंबर महिन्यापासून रेशनमधून त्याचे वाटप करण्यात येत असल्याने जिल्हावासीयांना उत्तर भारतीयांप्रमाणे मक्याची रोटी खावी लागली. विशेष म्हणजे जिल्ह्यात आठ तालुके आदिवासी असून, त्यांचे प्रमुख अन्न भात व नागली आहे, त्यांनादेखील शासनाने मका खाण्यास भाग पाडले. दर महिन्याला साधारणत: ३० हजार क्विंटल मक्याचे वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आले. आता एप्रिल महिन्यात शिल्लक असलेल्या ४९९९ क्विंटल मक्याचे वितरण करण्यात येणार असून, त्यातून मात्र नाशिक शहर, नाशिक तालुका, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, हरसूल या तालुक्यांना वगळण्यात आले आहे तर घोटी, सिन्नर, दिंडोरी, नांदगाव, मनमाड, सटाणा, चांदवड, कळवण, देवळा, येवला, मालेगाव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना मका खावा लागणार आहे.जिल्ह्यातील काही भागात रेशनमधून मका देण्यामागे मक्याची वाहतूक हा महत्त्वाचा विषय आहे. पणन महामंडळाकडून येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, देवळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मका खरेदी करण्यात आला असून, त्याची साठवणूकही त्या त्या तालुक्यातील गुदामात करण्यात आली आहे. त्यामुळे तेथूनच मक्याची उचल करून नजीकच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही. या उलट ग्रामीण भागातून मक्याची वाहतूक करून ती नाशिकसह पेठ, सुरगाणा या लांबच्या तालुक्यांमध्ये नेण्यासाठी मोठा वाहतूक खर्च येत आहे. मुळातच एक रुपया किलो दराने विक्री केल्या जाणाºया मक्यासाठी वाहतुकीचा खर्चच गेल्या चार महिन्यांत अधिक झाला.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक