शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहराला भगवी झालर ; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 22:56 IST

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत संपूर्ण आसमंत दुमदुमून टाकला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शहराला भगवी झालर प्राप्त झाली असून, शहरातील विविध मंडळांनी वाकडी बारव येथून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगीही मिळविली आहे. 

ठळक मुद्देनाशिक शहरात चौकाचौकात शिवजयंतीची तयारी शिवजयंतीच्या पूर्वसंधेला शहराला भगवी झालरशिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

नाशिक : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत संपूर्ण आसमंत दुमदुमून टाकला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शहराला भगवी झालर प्राप्त झाली असून, शहरातील विविध मंडळांनी वाकडी बारव येथून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगीही मिळविली आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे ध्वज, भगव्या पताका, मोठ्या आकारातील होर्डिंग्ज यांसह विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. शिवजयंतीनिमित्त मंगळवारी (दि.१९) ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल लंडन’मध्ये नोंदणी झालेली १३० किलो वजनाची, १३ फूट लांब ९ इंच रुंद पाते असलेल्या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचा मानाच्या पहिल्या मिरवणुकीत समावेश करण्यात येणार आहे. ढोल-ताशासोबतच पारंपरिक वाद्याच्या तालात निघणाºया या मिरवणुकीत भवानी तलवारीची ही प्रतिकृती पाहण्याची शिवप्रेमींमध्ये उत्सुकता असल्याने मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पहायला मिळणार आहे. संपूर्ण शहरातून मिरवणुकीत सहभागी होणाºया शिवप्रेमींच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मंच उभारण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा आदी ठिकाणी शिवजयंतीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. शहरातील चौकाचौकात भव्य होर्डिंग्जवर शिवनेरी किल्ल्याची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजदरबार, विविध मोहिमांच्या तयारीचे फलक यासह अश्वारूढ पुतळे, पूर्णाकृती, अर्धाकृती पुतळ्यांसाठी मंच उभारण्यात येत आहेत.   

असा असेल मिरवणुकीचा मार्ग जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून निघणारी मिरवणूक चौक मंडई, दादासाहेब फाळकेरोड, भद्र्रकाली मार्के ट, संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट अळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकमार्गे रामकुंडावर पोहोचणार आहे.  

पाच मंडळांना पोलिसांची परवानगी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढणाºया छत्रपती सेना, इंदिरानगरचे स्वराज्य प्रतिष्ठान, डिंगर आळी संभाजी चौकातील  शिवसाई फ्रेण्ड सर्कल, द्वारका परिसरातील अर्जून क्रीडा मंडळ, गजानन महाराज मित्रमंडळ या पाच मंडळांनी सोमवारी सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळवली असून, या मंडळांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत परवानगी मिळविणाºया आणखी काही मंडळांचीही यात भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीNashikनाशिक