शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांची पहिल्याच सभेत छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:09 IST

नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पहिल्याच सभेत आपल्या कार्यकौशल्याची छाप पाडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांना सावरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवाय त्यांनी काही ठोस आणि लागलीच निर्णय घेतल्यामुळे आजच्या सभेत गिते यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायी सभेत तत्काळ निर्णयया प्रश्नांवर मंत्र्यांची बैठकदेखील सभागृहात बोलविली जाईल,

नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पहिल्याच सभेत आपल्या कार्यकौशल्याची छाप पाडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांना सावरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवाय त्यांनी काही ठोस आणि लागलीच निर्णय घेतल्यामुळे आजच्या सभेत गिते यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कामनिहाय खर्चाचे नियोजन करण्यापेक्षा हेडनिहाय खर्चाचा प्रस्ताव तत्काळ करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना देत प्रलंबित कामांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांत महत्त्वाची बाब टेंडर प्रक्रियेतील विलंबावर आपला सर्वाधिक फोकस असल्याचे सांगून याबाबतची माहिती अधिकाऱ्याकडून घेतली असून, टेंडर प्रक्रिया सुरू होतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. ३० टक्के निधी खर्चाबाबतचे सुरू असलेल्या नियोजनाबाबत सन्मानिय सदस्यांनी तत्काळ माहिती देण्याचे आदेशही गिते यांनी देत सदस्यांच्या मागणीचा सन्मानही केला.कुपोषणाच्या कामावर जिल्हा परिषदेच्या कामात प्रचंड दिरंगाई असल्याचे मान्य करीत त्यांनी कुपोषणाच्या कामाकडे पुढील काळात बारकाईने लक्ष देणार असल्याचे सूचित केले. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या जागेच्या संदर्भात पशुसंवर्धन विभागातून तत्काळ इतिवृत्त मागवून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आताच्या आता व्हॉट््सअ‍ॅपवर इतिवृत्त मागवून घ्या  आपण स्वत: सचिवांशी बोललो असल्याचे सांगून त्यांनी इमारतीच्या इतिवृत्ताचा प्रश्नही मार्गी लावला.महावितरणकडून उपस्थित राहणाऱ्यां अभियंत्यांचीही त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. पुढील सर्वसाधारण सभेत जिल्ह्याशी संबंधित अभियंते बैठकीला उपस्थित असतील, असे आदेश देतानाच सदस्यांनी विजेसंदर्भातील सर्व प्रश्न माझ्याकडे आणून द्यावीत ते प्रश्न महावितरणकडे पाठवून पुढील सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णायक भूमिका त्यांनी मांडावी अन्यथा या प्रश्नांवर मंत्र्यांची बैठकदेखील सभागृहात बोलविली जाईल, असे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडसावले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद