शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॉसनं १२ कर्मचाऱ्यांना दिली महिंद्राची नवी कोरी कार; कुटुंबाला बसला सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 11:56 IST

महिंद्रा एक्सयुव्ही कारची किंमत १२ लाख ६० हजार रुपये एवढी असून तब्बल १२ कर्मचाऱ्यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे.

नाशिक - शहरातील डेअरी पॉवर या कंपनीने अतिशय अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. एकाचवेळी तब्बल १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही 300 ही कार भेट देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह इतरांसाठीही आनंद आणि प्रेरणादायी ठरली आहे. 

दूध आणि दूग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्या डेअरी पॉवर या कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही ३०० या कारचे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी हे कंपनीसाठी गुरुच आहेत, अशी भावना व्यक्त करीत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक दिपक आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. 

यासंदर्भात आव्हाड म्हणाले की, "माझा प्रत्येक कर्मचारी हा माझ्या परिवारातील सदस्यच आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे घर, गाडी आणि पैसा हे असणं आवश्यकच आहे. माझ्या प्रत्येक माणसाकडे गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही म्हणून मी या सदस्यांना दिली आहे. जर एक दिपक आव्हाड उभा राहिला तर आज ७५० लोकं उभे राहतात, तर असे जवळपास मला १०० दिपक आव्हाड उभे करायचे आहेत. तरच आपण नाशिकसाठी काहीतरी परिवर्तन घडवू शकू आणि एकूणच या माध्यमातून नाशिक मोठं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, नाशिकचं नाव सगळीकडे पोहोचवणं, तसेच वर्तुळ व्यवसाय धोरण वापरून नाशिकचा पैसा हा नाशिक मध्येच कसा राहील या साठी मी नेहमी प्रयत्नशील असतो असं त्यांनी सांगितले. 

महिंद्रा एक्सयुव्ही कारची किंमत १२ लाख ६० हजार रुपये एवढी असून तब्बल १२ कर्मचाऱ्यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे. नाशिकमध्येच निर्मिती होणाऱ्या महिंद्रा कारचीच निवड करण्यात आली. म्हणजेच, नाशिकच्या डेअरी पॉवर कंपनीने नाशिकमध्येच उत्पादित होणाऱ्या महिंद्रा कंपनीची कार नाशिकच्याच कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. महिंद्राचे डीलर असलेल्या जितेंद्र ऑटोमोटिव्ह या शोरुममध्ये छोटेखानी कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला. त्यात या कर्मचाऱ्यांना ही कार गिफ्ट देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांमध्ये प्रचंड आनंद आणि समाधानाचे वातावरण होते.

‘महिंद्रा’च का?महिंद्रा कंपनी नाशिकमध्ये आल्यानंतर हजारो हातांना काम मिळाले आहे व त्यामुळे  खऱ्या अर्थाने नाशिकची भाग्यरेषा समृद्ध झाली आहे.  महिंद्रासारखी एक कंपनी जर आपल्या नाशिकला एवढं देऊ शकते तर आपण एक नाशिककर म्हणून त्या कंपनीला देखील काही देणं लागतो या भावनेतून आव्हाड यांनी नाशिक महिंद्राची निवड केली आहे,  तसेच आपल्या नाशिकचा पैसा हा नाशिकमध्येच राहावा आणि त्याचा नाशिकच्या लोकांना फायदा व्हावा हा देखील यामागचा एक महत्वाचा हेतू आहे. या आधी देखील आव्हाड यांनी डेअरी पॉवरसाठी  महिंद्रा कंपनीची तब्बल १२३ कमर्शियल वाहने घेतली असून नाशिकच्या जितेंद्र मोटर्स मुळे महिंद्रा कंपनीने आजमितीस नाशिकमध्ये करोडो रुपयांची उलाढाल केली आहे आणि  यामुळे नक्कीच नाशिकच्या अर्थकारणात नक्कीच मोठी भर पडली आहे.