शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
4
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
5
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
6
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
7
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
8
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
9
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
10
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
11
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
12
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
14
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
15
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
16
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
17
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
18
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
19
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
20
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या बोटी पर्यटन मंत्र्यांनी सारंगखेड्याला पळविल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:14 IST

नाशिक येथे प्रादेशिक पर्यटनमधील निधीतून जागतिक दर्जाच्या बोट क्लबचे काम मार्च २०१४ मध्ये पुर्ण होऊनही हा बोटक्लब सुरू करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देआमदार जाधव, झिरवाळ यांचा आरोप : विधीमंडळ पाय-यांवर निदर्शने निधी मंजुर असुनही सदरचे काम सुरू झालेले नाही.

नाशिक : पर्यटन वाढीसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गंगापुर धरणावर उभारलेल्या बोट क्लबसाठी खरेदी केलेल्या बोटी नंदुरबार जिल्ह्याच्या सारंगखेड्याच्या पर्यटनस्थळी पळविण्यात आल्याचा आरोप करून बुधवारी राष्टÑवादीचे आमदार जयंत जाधव व नरहरी झिरवाळ यांनी नागपुर विधीमंडळाच्या पाय-यांवर बसून सरकारच्या विरोधात निदर्शने केली.नाशिक येथे प्रादेशिक पर्यटनमधील निधीतून जागतिक दर्जाच्या बोट क्लबचे काम मार्च २०१४ मध्ये पुर्ण होऊनही हा बोटक्लब सुरू करण्यात आलेला नाही. सदर बोट क्लब गंगापुर धरणाच्या बॅक वॉटर भागात असून, या ठिकाणी जेट्टी, प्र्रशासकीय इमारत,इक्विपमेंट करिता देखभाल दुरूस्ती शेड, प्रेक्षक गृह, खुले सभागृह, वाहनतळ इत्यादी तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना बोटिंगसाठी युएसए मेड युरो ४ नॉर्मच्या४७ अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झालेल्या आहेत. तसेच पक्षांबाबत जनजागृतीसाठी पक्षीमित्रांकरीता स्वतंत्र कार्यालय आणि पक्षांच्या चित्रांचे दालन देखील येथे उभारण्यात आले आहे. साहसी क्रिडा संकुलआणि कन्व्हेन्शन सेंटर ही कामे रखडलेली आहेत. निधी मंजुर असुनही सदरचे काम सुरू झालेले नाही. गेल्या तीन वर्षापासून बोट क्लब लवकरात लवकर सुरू करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात विद्यमान पर्यटन मंत्र्यांनी येथील बोटी सारंगखेडा या पर्यटनस्थळी नेल्या आहेत. सदरच्या बोटी लवकरात लवकर पुन्हा नाशिक येथे आणण्यात याव्यात व बोट क्लब सुरू करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार जयंत जाधव व नरहरी झिरवाळ यांन केली व त्यासाठी नागपुरच्या विधीमंडळ अधिवेशन दरम्यान सभागृहाच्या पायºयांवर बसून सरकारचा विरोधात निदर्शने केली.

टॅग्स :boat clubबोट क्लबNashikनाशिक