शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत ५६ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 1, 2017 00:19 IST

११ जुलैला मतदान ; ७३ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी माघार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक बार असोसिएशनच्या ११ जागांसाठी ११ जुलै रोजी होत असलेल्या निवडणुकीत गुरुवारी (दि़२९) अर्ज माघारीच्या दिवशी ७३ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ असोसिएशनच्या ११ जागांसाठी दर चार वर्षांनी निवडणूक घेतली जाते़ जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील ३ हजार ५४ वकील असोसिएशनचे मतदार आहेत. नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात असून, त्यामध्ये बारचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ श्रीधर माने, अ‍ॅड़ अशोक आव्हाड, अ‍ॅड़ झुंझार आव्हाड, अ‍ॅड़ विजय मोरे, अ‍ॅड़ महेश अहेर यांच्यात लढत होणार आहे़ उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड़ सुरेश निफाडे, अ‍ॅड़ प्रकाश अहुजा, अ‍ॅड़ पुंडलीक गिते, अ‍ॅड़ सुदाम पिंगळे, अ‍ॅड़ अनिल शालिग्राम, तर सचिव पदासाठी अ‍ॅड़ धर्मेंद्र चव्हाण, अ‍ॅड़ भाऊसाहेब ढिकले, अ‍ॅड़ वैभव शेटे, अ‍ॅड़ जालिंदर ताडगे, अ‍ॅड़ राजेंद्र ठाकरे यांच्यात लढत होणार आहे़असोसिएशनच्या सहसचिव पदासाठी अ‍ॅड़ शरद गायधनी, अ‍ॅड़ हेमंत गायकवाड, अ‍ॅड़ प्रवीण साळवे, सहसचिव (महिला राखीव) या पदासाठी अ‍ॅड़ श्यामला दीक्षित, अ‍ॅड़ विजया माहेश्वरी, अ‍ॅड़ अपर्णा पाटील, अ‍ॅड़ मंगला शेजवळ, खजिनदार पदासाठी अ‍ॅड़ रवींद्र चंद्रमोरे, अ‍ॅड़ संजय गिते, अ‍ॅड़ लीलाधर जाधव, अ‍ॅड़ दर्शन कुलकर्णी, अ‍ॅड़ बाबासाहेब नन्नावरे, सदस्य (तीन पदे) या पदासाठी अ‍ॅड़ केशव अहेर, अ‍ॅड़ भूमिनी भावसार, अ‍ॅड़ राजेंद्र भुतडा,अ‍ॅड़ अरुण दोंदे, अ‍ॅड़ जयवंत गायधनी, अ‍ॅड़ अनिल गायकवाड, अ‍ॅड़ रत्नदीप गायकवाड, अ‍ॅड़ हर्षद केंगे, अ‍ॅड़ मदन खैरनार, अ‍ॅड़ मिलिंद कुरकुटे, अ‍ॅड़ महेश लोहिते, अ‍ॅड़ अतुल लोंढे, अ‍ॅड़ प्रभाकर मटाले, अ‍ॅड़ शरद मोगल, अ‍ॅड़ तुषार निरगुडे, अ‍ॅड़ प्रेमनाथ पवार, अ‍ॅड़ सईद सय्यद, अ‍ॅड़ नीचल सूर्यवंशी, अ‍ॅड़ स्वप्निल ठुबे, अ‍ॅड़ महेश यादव (पाटील) असे वीस उमेदवार रिंगणात आहेत़सदस्य (महिला राखीव) या पदासाठी अ‍ॅड़ सोनल कदम, अ‍ॅड़ शबनम मेमन, अ‍ॅड़ मनीषा मंडलीक, अ‍ॅड़ स्वप्ना राऊत या चार महिला वकील, तर सदस्य पदाच्या (७ वर्षांच्या आतील प्रॅक्टिस) एका जागेसाठी अ‍ॅड़ अच्युत निकम, अ‍ॅड़ मोहन निसाळ, अ‍ॅड़ कमलेश पाळेकर, अ‍ॅड़ दिलीप पिंगळे, अ‍ॅड़ सोमनाथ पिंगळे, अ‍ॅड़ किशोर सांगळे, अ‍ॅड़ वसीम सय्यद निवडणूक रिंगणात आहेत़ उमेदवारांनी निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरू केला असून, प्रत्यक्ष भेटीगाठी, छापील पत्रके तसेच सोशल मीडियाचा (व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर) प्रभावी वापर सुरू केला आहे़ या निवडणुकीसाठी अ‍ॅड़ एस़ जी़ सोनवणे, अ‍ॅड़ व्ही़ एम़ जुन्नरे, अ‍ॅड़ एम़ एऩ बस्ते हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत़ --इन्फो-- ११ जुलैला मतदान११ जुलै २०१७ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत जिल्हा न्यायालय, नवीन कोर्ट इमारत, पहिला मजला येथील आयटी लायब्ररीमध्ये मतदान होणार आहे़ १२ जुलै रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहसचिव (महिला) या पदासाठीची मतमोजणी सकाळी ९ वाजेपासून सुरू होऊन मोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे, तर १३ जुलै रोजी उर्वरित पदांची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे़