शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घटनेनंतर परिसरात तणाव

By admin | Updated: October 9, 2016 11:34 IST

तळेगाव येथे पिडितेला भेटण्यासाठी आलेल्या आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीवर संतप्त जमावाने चप्पल फेकत आपला निशेद्ध नोंदवला तर तळेगाव पोलीस स्थानकाचे डी आय जी यांच्या मोटारीवरही जमावाकडून दगडफेक

ऑनलाइन लोकमत

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री उशिरा त्र्यंबक पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान संतप्त ग्रामस्थांकडून अंजनेरी फाट्यासह वाडीवऱ्हे व घोटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव (अंजनेरी) येथे एका अल्पवयीन मुलाने शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातीलच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. एका निर्जन कार्यालयामध्ये त्याने हे कृत्य केले. यासंदर्भात त्र्यंबक पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी धाव घेतली. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. 

तळेगाव येथे पिडितेला भेटण्यासाठी आलेल्या आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीवर संतप्त जमावाने चप्पल फेकत आपला निशेद्ध नोंदवला तर तळेगाव पोलीस स्थानकाचे डी आय जी यांच्या मोटारीवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे. 
 
चिमुरडीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला - गिरीश महाजन
बकेश्वर तालुक्यातील तळेगाव बलात्कार प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आज सकाळी पिडीतेची विचारपूस आणि भेटीसाठी जिल्हा रुग्णालयात गेले होतो. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी असे स्पष्ट केले की, पिडीतेवर आत्याचार झाला नाही तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी पहाटे रूग्णालयात जाऊन संबंधित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुलीची प्रकृती उत्तम आहे. तसेच या बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला, आणि आपल्या सर्वांच्या आणि त्या चिमुरडीच्या सुदैवाने, या बालिकेवर अतिप्रसंग करण्यात यश आलं नाही, या बालिकेची ४ महिला डॉक्टरांनी तपासणी केली, यात तिच्यावर अतिप्रसंग झाला नसल्याचं सांगण्यात येतं आहे. 
 
दरम्यान, त्याचवेळी पालकमंत्र्यांना संतप्त जमावाने घेराव घातला  आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आज सकाळी एकनाथ कडसे यांनीही तळेगाव येथे हजेरी लावली असता. जमावाने त्यांना घेरीव घातला. त्यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्र्याशी माझं बोलणं झालं आहे. १५ दिवसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होईल. 

दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी तळेगाव अंजनेरी फाट्यावर दगडफेक केली. त्यापाठोपाठ वाडीवऱ्हे, घोटी येथेही रास्तारोको करण्यात आले. नातेवाईकांचे ठिय्या आंदोलनपोलिसांनी संशयित व पीडितेला तपासणीसाठी पाठविले. जिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टाराकडून पीडित मुलीची तपासणी करावी, यासाठी तिच्या नातेवाईकांनी आग्रह धरला. मात्र रुग्णालयात महिला डॉक्टर नसल्याने ठिय्या आंदोलन केले.

मुंबई- नाशिक मार्गावरील वाहतूक ठप्पसंतप्त गावक-यांनी अंजनेरी फाट्यासह वाडीवऱ्हे व घोटी येथे रास्तारोको आंदोलन केल्यामुळे मुंबई- नाशिक मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास वाहतूक सुरु झाली.

अल्पवयीन मुलगी अत्याचारप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी. - अंकुश शिंदे, ग्रामीण पोलीस अधीक्षक