नाशिक : महाराष्ट्र फुटबॉल टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या संघांनी सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर अशा तीनही गटांचे अजिंक्यपद पटकावले़ सोलापूर येथे झालेल्या या स्पर्धेत १८ जिल्'ांच्या संघांतील ७५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता़ नाशिक जिल्'ाच्या संघाने तीनही गटांत अखेरपर्यंत वर्चस्व राखत अजिंक्यपद पटकावले़ जिल्'ाच्या संघात सोहम तमखाने, केसर शुक्ला, मानस केंगे, मनन पटणी, मानस खनोरे, चाणक्य भाटिया, सुजय साखला, गौरव वंजारे, सहिल हिरे, धु्रव बालाजी, अनिष गोखले, देव पवार, तेजस भगत, धनसिंग पाल, आकांक्षा शेळके, रिचा बापट, तेजश्री पाटील, जान्हवी शिरसाठ, शंतनू राऊत, राहुल सूर्यवंशी यांचा सामावेश होता़ त्यांना प्रशिक्षक राजेंद्र बहादूर, सनी रायख, गणेश राऊत यांचे मार्गदर्शन लाभले़
राज्य फुटबॉल टेनिसमध्ये नाशिक अजिंक्य
By admin | Updated: January 28, 2015 01:49 IST