शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 01:12 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला राज्य शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी संबंधित विभागासह व जिल्हा उपनिबंधक व सर्व बाजार समित्यांना यासंदर्भात परिपत्रक काढून सूचित केले आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रियाही पुन्हा लांबणीवर गेली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक लांबणार : सहकार, पणन विभागाचे बाजार समित्यांना पत्र

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला राज्य शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी संबंधित विभागासह व जिल्हा उपनिबंधक व सर्व बाजार समित्यांना यासंदर्भात परिपत्रक काढून सूचित केले आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रियाही पुन्हा लांबणीवर गेली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला यापूर्वी दोनवेळा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात १९ ऑगस्ट रोजी ही मुदतवाढही संपुष्टात आल्याने संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी मंडळाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज केला होता. उपनिबंधक कार्यालयाने हा अर्ज पणन मंडळाकडे पाठविला होता. त्यावर राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसल्याचे सांगत बाजार समितीला पुन्हा एकदा २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाडून नाशिक बाजार समितीला प्राप्त झाले आहेत.

 

इन्फो-प्रशासकाच्या चर्चेला पूर्णविराम

 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास दिलेली मुदतवाढ संपताच प्रशासक नियुक्ती करावी आणि निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते, तर बाजार समिती प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणीत दोनच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक बसण्याच्या चर्चेला आणि निवडणूक प्रक्रियेला तूर्तास ब्रेक लागला आहे.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती