शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

नाशिकमध्ये भारिप बहुजन महासंघाचे सरकारच्या विरोधात घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:03 IST

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील बहुजन बौद्ध समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात

ठळक मुद्देबहुजन बौद्ध समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, दंगलीचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी

नाशिक : भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भारिप बहुजन महासंघाने घोषित केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून घंटानाद केला.भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील बहुजन बौद्ध समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची केलेली मोडतोड दुरुस्त करा, यांसह नाशिक शहरात कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने उभे करण्यासाठी जागा नसताना पोलिसांकडून सदर वाहने उचलून नेली जात असून, त्यापोटी ७०० ते ८०० रुपयांचा दंड आकारला जातो. जो महापालिका पार्किंगची व्यवस्था करीत नाही तोपर्यंत दंड आकारण्यात येऊ नये, अशी मागणीही आंदोलकर्त्यांनी केली आहे.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष वामनराव गायकवाड, अरविंद जगताप, विनय कटारे, गौतम बागुल, अरुण जाधव, राजू गोतीस, संजय तायडे, करुणासागर पगारे, अजय काळे, महेंद्र जाधव, सम्राट पगारे, विश्वनाथ भालेराव, जितेश शार्दुल, रसंगीता पवार, प्रतिमा जाधव, सविता खैरनार, मिलिंद पगारे, अशोक मोरे, प्रतिभा पाणपाटील, जालिंदर पगारे, सागर बोडके, अमोल मोरे, विलास खरात, परेश सोनवणे, बाळा गायकवाड, दीपचंद दोंदे, मोहन म्हसदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, ओबीसी संघटना, यशवंत सेना, आदिवासी जनआंदोलन, भाकप, मराठा महासंघ, लिंगायत समाज संघाने पाठिंबा दिल्याचा दावा भारिप बहुजन महासंघाने केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक