शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

नाशिक पुन्हा राज्यात नीचांकी

By admin | Updated: December 5, 2015 23:19 IST

पारा १२.५ अंश सेल्सिअसवर

नाशिक : काही दिवसांपूर्वी निर्माण झालेले ढगाळ वातावरण पूर्णत: निवळल्याने शहरात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून, शहराच्या किमान तपमानाचा पारा शनिवारी राज्यात नीचांकी १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला. नाशिकखालोखाल शनिवारी नागपूर व गोंदियात (१३.१) नीचांकी तपमानाची नोंद झाली. गेल्या २० नोव्हेंबर रोजी शहरात मोसमातील नीचांकी तपमानाची नोंद (११.५) झाली होती; मात्र या दरम्यान आग्नेय व पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह शहराला पावसाने झोडपून काढले होते. ढगाळ वातावरणामुळे शहराचा पारा वाढला होता. आता हे वातावरण पूर्णत: निवळल्याने पुन्हा तपमान घटण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांत पाऱ्यात तब्बल पाच अंशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे पहाटे व रात्री थंडीचा कडाका जाणवू लागला असून, नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. बाजारात स्वेटर, कानटोप्या, कानपट्ट्या, स्कार्फ खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी नाशिकखालोखाल राज्यात नागपूर, गोंदिया (१३.१), पुणे (१४.८), जळगाव, अकोला, अहमदनगर (१५) असे किमान तपमान होते. (प्रतिनिधी)