शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक @ ९.४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:30 IST

मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, सलग दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा ९.४ अंशावर स्थिरावला आहे. मंगळवारी (दि. २६) तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.

नाशिक : मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, सलग दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा ९.४ अंशावर स्थिरावला आहे. मंगळवारी (दि. २६) तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.  राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये जाणवत होता. मंगळवारी गोंदियामध्ये नीचांकी ८.५ इतके किमान तपमान नोंदविले गेले, तर सर्वाधिक थंडी असलेले नाशिक हे राज्यातील दुसºया क्रमांकाचे शहर ठरले. एकूणच विदर्भातील गोंदियानंतर नाशकात कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका जास्त प्रमाणात गारठला आहे. सोमवारपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या खाली राहत असून, शहरात थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिककर गारठले आहे.  मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक नीचांकी तपमानाची नोंद नाशिकमध्ये होत होती. किमान तपमानाचा पारा ९ अंशांच्या जवळपास राहत असल्यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिकच जाणवत आहे. एकूणच उत्तर भारतात आलेल्या शीतलहरीमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे शहरात उबदार कपड्यांच्या वापरावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. याबरोबरच शेक ोट्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. गोदाकाठासह शहराला लागून असलेल्या मळे परिसरात थंडीची तीव्रता जास्त जाणवत असल्याने संध्याकाळी ६ वाजेपासूनच या भागांमध्ये शेतकºयांकडून शेकोट्या पेटवून गप्पांचे फड रंगत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणनू प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये किमान तपमान १४ अंश इतके नोंदविले गेले आहे. यापेक्षा पाच अंशांनी कमी तपमान नाशिकमध्ये, तर गोंदियामध्ये सहा अंशांने कमी तपमान राहिले. एकूणच नाशिकसह गोंदिया जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे. पुढील काही दिवस डिसेंबरअखेरपर्यंत नाशिकमध्ये किमान तपमान दहा अंशांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक