शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक @6.2 : तापमानाचा पारा पुन्हा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 18:12 IST

या आठवड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता.

ठळक मुद्दे२०१७ मधील ५.४ अंश किमान तापमान नोंदीचा विक्रम मोडित उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम पर्जन्यमानाचे प्रमाण यंदा अल्प थंडीचा कडाका मात्र अधिक

नाशिक: पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस लोटले असून, थंडीचा कडाका शहरात कायम असल्याने वातावरणात गारठा टिकून आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.१) किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून, ६.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले.थंडीच्या या हंगामातील नीचांकी नोंद शनिवारी (दि.२९) ५.१ अंश इतकी झाली. गुरुवारी (दि.२७) पारा ५.७ अंशांवर सरकला होता.

यामुळे या आठवड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता. थंडीची तीव्रता सोमवारी जरी काहीशी कमी जाणवली असली तरी मंगळवारी मात्र पहाटे थंडीचा जोर अधिक राहिला. कारण सोमवारी मध्यरात्रीपासून थंड वारे वेगाने वाहू लागले होते. डिसेंबरअखेर पारा ५ अंशांपर्यंत घसरल्याने ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. त्यामुळे २०१७ मधील ५.४ अंश किमान तापमान नोंदीचा विक्रम मोडित निघाला आहे.

उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम  वातावरणावर होत असून, त्यामुळे नाशिकचे किमान तापमान दहा अंशांच्या खाली स्थिरावत आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून निफाड तालुका गोठलाही आहे. निफाडचे तापमान तर पाच अंशांच्या खाली नोंदविले जात असल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत. थंडीचा वाढता कडाका नागरिकांना त्रस्त करणारा ठरू लागला आहे. पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस होऊनदेखील थंडीच्या तीव्रतेपासून दिलासा मिळता मिळत नसल्याने नागरिकही चिंतेत सापडले आहे. शहरासह जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण यंदा अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र अधिक आहे.नाशिककर त्रस्त, औरंगाबादकरांना दिलासाराज्यात सर्वाधिक कमी तापमान सलग दुस-या दिवशी अहमदनगरमध्ये ४.६ नोंदविले गेले तर नागपूरमध्ये ५.४ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील तिस-या क्रमांकाचे सर्वाधिक थंडी असलेले शहर सध्या नाशिक असून, महाबळेश्वरमध्येही पारा १२.४ अंशांवर तर औरंगाबादकरांनाही थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला असून, पारा ८.४ अंशांपर्यंत वर सरकला आहे. गोंदियामध्ये ६.७ तर चंद्रपूरमध्ये ६.८ अंश किमान तापमानाची मंगळवारी सकाळी नोंद झाली.राज्यातील या शहरांमध्ये कडाका (किमान तापमान अंशात)अहमदनगर- ४.६नागपूर- ५.४अकोला- ७.२परभणी- ७.५अमरावती- ९.८औरंगाबाद- ८.४चंद्रपूर- ६.८गोंदिया- ६.७

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान