शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक @ ३४ : वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:50 IST

मार्च महिन्याला प्रारंभ होताच शहराच्या कमाल तपमानात वाढ होत आहे. सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८ अंशांपर्यंत वर सरकला, तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

नाशिक : मार्च महिन्याला प्रारंभ होताच शहराच्या कमाल तपमानात वाढ होत आहे. सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८ अंशांपर्यंत वर सरकला, तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे.  फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या. हवामानातही बदल झाला असून, मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी ३६.२, तर दुसºया दिवशी ३६.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानात काही अंशी घट झाली असली तरी वाताव-रणातील उष्मा कायम आहे. उन्हाची तीव्रता कायम असून, तपमानाचा पारादेखील ३५ अंशांच्या जवळपास स्थिरावत आहे. मार्च महिना संपूर्णत: ‘हॉट’ राहणार असून, शहराच्या कमाल तपमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. उत्तर महाराष्टÑातील नाशिक, नंदुरबार, जळगाव, मालेगाव या शहरांचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे सरकले आहे. राज्यात भिरा येथे सर्वाधिक ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली. यापाठोपाठ चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांनाही उन्हाचा जोरदार तडाखा बसत आहे. भिरानंतर चंद्रपूरमध्ये ३८.४ इतके कमाल तपमान नोंदविले गेले. एकूणच विदर्भात उष्मा वाढला आहे. नाशिकमध्येही उन्हाची तीव्रता वाढत असून, वाºयाचा वेग मंदावलेला राहिला, तर कमाल तपमानाचा पारा अधिक वर सरकण्याची शक्यता आहे. एकूणच कडाक्याच्या थंडीनंतर आता नाशिककरांना उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करावा लागणार आहे. हवामान बदल आणि उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. नागरिकांनी पाणी भरपूर पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत; मात्र उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड फळे, फ्रीजमधील पाणी, बर्फाचे गोळे, आइस्क्रीमचा होणारा मोह तूर्तास टाळणे आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे आहेत. थंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर केलेला उत्तम, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.स्कार्फ, कॅपला मागणीउन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे स्कार्फ, कॅप, गॉगल्स, हॅट, ओढणी, सनकोट आदी वस्तूंना मागणी वाढली आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणात स्कार्फ, सनकोट गॉगल्ससह सन लोशन क्रीमचा वापर करतात. यामुळे या वस्तूंना मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे किमतीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :TemperatureतापमानNashikनाशिक