शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नासाका, निसाका भाडेतत्त्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:46 IST

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वारंवार तगादा लावूनही थकबाकी न भरणाऱ्या ५९६ सभासदांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच आगामी गळीत हंगाम लक्षात घेता बॅँकेच्या ताब्यात असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे ठरविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा बॅँक : ५९६ सभासदांवर लवकरच फौजदारी गुन्हे

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वारंवार तगादा लावूनही थकबाकी न भरणाऱ्या ५९६ सभासदांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच आगामी गळीत हंगाम लक्षात घेता बॅँकेच्या ताब्यात असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे ठरविण्यात आले.जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बँकेच्या विविध शाखांमधून अल्प मुदत, मध्यम मुदत व दीर्घ मुदतीचे थेट कर्ज घेतलेल्या ५९६ सभासदांकडे जूनअखेर १० कोटी २७ लाख मुद्दलाची व ७ कोटी ६० लाखांची व्याजाची थकबाकी झालेली आहे. या थकबाकीदाराकडे कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करूनही रकमेचा भरणा करत नाही. त्यामुळे थेट कर्जाच्या थकबाकी रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यासाठी थकीत थेट कर्जदारा विरोधात फौजदारी कारवाई करणेबाबत चर्चा होऊन कायदेशीर मार्गदर्शन घेऊन त्वरित कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या बिगरशेती संस्थांकडे जुनी थकबाकी झाली आहे. अशा संस्थांच्या संचालक मंडळावरदेखील फौजदारी गुन्हे दाखल करणेबाबत निर्णय घेण्यात आला.बँकेच्या विविध शाखांमार्फत जूनअखेर थकबाकीदार सभासदांविरुद्ध कलम १०१ ची प्रकरणे सहकार खात्याकडे दाखल करून रक्कम वसुलीबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक व बँकेचे विभागीय अधिकाºयांची प्रधान कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन त्वरित १०१चे दाखले देणेबाबत सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. नासिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देणेबाबतची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निफाड सहकारी कारखाना शासकीय दरानुसार भाडेतत्त्वावर देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच त्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात य्२ोणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेकडून देण्यात आली.