शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात वाढले नाष्टा पॉइंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:43 IST

सकाळी सकाळी गरमागरम भजी, मिसळ यांबरोबर धिरडे, पराठे, पोहे, उपमा, इडली, डोसा यांसारखे घरगुती पदार्थ रस्तोरस्ती मिळू लागले आहेत.

इंदिरानगर : सकाळी सकाळी गरमागरम भजी, मिसळ यांबरोबर धिरडे, पराठे, पोहे, उपमा, इडली, डोसा यांसारखे घरगुती पदार्थ रस्तोरस्ती मिळू लागले आहेत. शिक्षणासाठी शहरात राहणारे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांची या स्वस्त नाष्ट्याला पसंती मिळू लागल्याने शहरात नाष्टा पॉइंट वाढीस लागले आहेत.पुणे, मुंबई प्रमाणेच नाशिकमध्येदेखील आता शिक्षणासाठी वास्तव्यास असलेले विद्यार्थी, बदली होऊन आलेले कामगारदेखील एकटेच राहात असल्याने त्यांना अशा नाष्टा पॉइंटचा आधार झाला आहे. सकाळच्या सुमारास चारचाकी वाहन किंवा रस्त्याच्या कडेला टेबल-खुर्च्या मांडून दुकाने चालविली जात आहेत. विशेष म्हणजे घरगुती बनावटीचे सर्व पदार्थ असल्यामुळे ग्राहकांचीदेखील चांगली पसंती मिळत आहे.शहरात विविध उपनगरांमध्ये विविध अन्य शहरांतून आणि गावातून नोकरी, व्यवसाय व उद्योगासाठी तसेच शिक्षणासाठी युवक-युवती वास्तव्यास आलेले आहेत. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या या युवकांसाठी तयार नाष्टा उपयुक्त ठरत आहे. सकाळी आणि रात्रीच्या जेवणासाठी मेस लावलेल्यांना मेसच्या ठिकाणी सकाळी सकाळी जावे लागते. सर्वांनाच ते शक्य होत नसल्याने सकाळचा नाष्टा जवळपासच्या हॉटेलमध्येच करावा लागतो. हॉटेलच्या नाष्ट्याला पर्याय म्हणून परिसरात घरगुती नाष्टा पॉइंट सुरू झाल्याने त्यास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सकाळी सात वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत नाष्टा पॉइंट सुरू असतात. या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना एक जोड व्यवसाय मिळाला आहे.सध्याच्या काळात कुटुंबामध्ये पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असल्याने स्वयंपाक करण्यासाठी महिलांना घरी पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे नाश्ता सेंटरवर विविध प्रकारचे पदार्थ घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी होत आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या आवडीनुसार नाश्त्याचे पदार्थ मिळत असल्याने सर्वच ठिकाणी सकाळपासूनच ग्राहक येत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :foodअन्नNashikनाशिक