शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधून नारायण राणे? भुजबळांना देणार शह, शिवसेनेच्या वर्चस्वाला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:05 IST

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून, नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे

- श्याम बागुलनाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून, नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरुंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच, शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजपा खेळू पाहात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तूर्त तरी भाजपाने आघाडी घेतल्याने, राणे यांचा विजय सुकर असल्याचे गणित मांडण्यात येत आहे.नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसला, तरी त्यांच्या महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाने राष्टÑीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्यावर भाजपा-सेनेत एकमत झालेले आहे. त्या वेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.राणे यांच्या उमेदवारीमागे भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा मनसुबा रचला आहे. त्यात विशेष करून गेल्या २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले छगन भुजबळ नजीकच्या काळात बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ बाहेर येताच, ते पहिल्यांदा भाजपाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करतील व आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करतील.अशा वेळी भुजबळांइतकेच आक्रमक नेतृत्व राणे यांच्याकडे आहे. याशिवाय जिल्ह्यात शिवसेना प्रत्येक वेळी भाजपाला अडचणीत आणत असल्याने, शिवसेनेला वठणीवर आणण्याची खास जबाबदारी राणे यांच्यावर सोपविली जाणार आहे. शिवाय राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत पातळीवर कोणी विरोध करण्याची हिंमत करणार नाही व राणेंना निवडून आणणे अगदीच सोपे होणार आहे, असा तज्ज्ञांचा होरा आहे.सख्य कामी येणारनारायण राणे यांचा तसा नाशिकशी घनिष्ठ संबंध असून, येथील राजकीय परिस्थिती त्यांना चांगलीच अवगत आहे. राणे मुख्यमंत्री असताना, त्यांच्याशी सेना-भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचे चांगले सूत जमले होते. त्यानंतर, त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही हा लोभ कायम होता. राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाचे, तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील कामगार युनियनचे अजूनही लागेबांधे आहेत. अशा परिस्थितीत राणे यांचे नेतृत्व सर्वमान्य होण्याची भाजपाला पुरेपूर खात्री आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे