शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

पक्षांतर्गत नाराजीत आमदार त्रयींचा कस

By admin | Updated: February 10, 2017 00:35 IST

पक्षांतर्गत नाराजीत आमदार त्रयींचा कस

 नामदेव भोर  नाशिकप्रभाग तसा भाजपाला अनुकूल, परंतु त्याचमुळे इच्छुकांची संख्याही अधिक आणि त्यामुळे नाराजीही भरपूर. अशा स्थितीत नाराजी आणि बंडखोरीचे मोठे आव्हान भाजपासमोर उभे आहे. विशेष म्हणजे या प्रभागात भाजपाचे तीन आमदार असून, साहजिकच या तीन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये अगोदरच्या प्रभाग रचनेनुसार आमदार सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर तर दुसऱ्या प्रभागात भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे विद्यमान नगरसेवकही आहेत. साहजिकच आता या तिघांचा प्रभाग एकत्र झाला असल्याने या प्रभागात जे काही होईल ते आमदारच ठरवतील, असेच मानले जात आहे. तिन्ही आमदार भाजपाचे असल्याने त्यांचा उमेदवारी ठरविण्यात वरचष्मा आहे. त्यातही भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते (कै.) पोपटराव हिरे यांचे चिरंजीव योगेश ऊर्फ मुन्ना हिरे आणि आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या घरातून त्यांच्या चुलत भगिनी हिमगौरी आडके- अहेर उमेदवार असल्याने त्यांच्या अस्तिवाचा आणि आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यातही हिमगौरी यांची ओळख ही आमदारांची भगिनी असली तरी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती बाळासाहेब अहेर तसेच माजी उपमहापौर शोभना अहेर यांची कन्या म्हणून अधिक आहे. अर्थातच, उमेदवारी देताना घराणेशाही जोपासल्याने भाजपात नाराजांची संख्या अधिक आहे. निवडणुकीत या प्रभागातून एकूण १८ जणांनी इच्छुक म्हणून दावेदारी केली होती, त्यातूनच स्पर्धा लक्षात येते. प्रभागात शिवसेनेचे विद्यमान महानगर प्रमुख आणि गटनेता अजय बोरस्ते हे नगरसेवक असल्याने त्यांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा प्रभाग आहे. परंतु त्यांनी आपल्या जोडीला राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या तंबूतील उमेदवार दिल्याने तेथे मूळ शिवसैनिकही नाराज आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत, परंतु त्यापेक्षा लढत ही भाजपा- सेना आणि बंडखोरांमध्येच अधिक रंगणार आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील ड या सर्वसाधारण जागेसाठीची लढत सर्वाधिक लक्षवेधी असून, तेथे भाजपाचे योगेश हिरे, शिवसेनेचे गोकुळ पिंगळे आणि भाजपाचे बंडखोर मधुकर हिंंगमिरे यांच्यात प्रामुख्याने लढत दिसते आहे. मधुकर हिंगमिरे यांना गेल्यावेळी डावलण्यात आले होते आणि आता भाजपातील घराणेशाहीमध्ये कार्यकर्ता डावलला जात असल्याच्या नाराजीतून त्यांनी आव्हान दिले आहे. तर गोकुळ पिंगळे हे मूळचे राष्ट्रवादीचे असून, त्यांनी नगरसेवकपद भूषविले आहे. गेल्यावेळी भाजपाचे राहुल अहेर यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू म्हणूनही ते परिचित असून, साहजिकच या तिघांभोवती आज तरी निवडणूक चर्चेत ठरली आहे. याच प्रवर्गातून विनोद सोलंकी (राष्ट्रवादी कॉँग्रेस), आनंद ढोली (धर्मराज्य पक्ष), रेशन जाधव (अपक्ष) व राकेश साळुंके (अपक्ष) निवडणूक रिंगणात आहेत.प्रभाग सातमधील अ या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी शिवसेनेचे अजय बोरस्ते यांना भाजपाचे नरेंद्र पवार आणि मनसेचे सत्यम खंडाळे यांचे आवाहन आहे. बोरस्ते यांच्या मूळ प्रभागापेक्षा हा प्रभाग विस्तृत आहे. शिवाय शरद देवरे, रवींद्र जाधव यांच्यासारखे जुने शिवसैनिक डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीचे आव्हान बोरस्ते यांना पेलावे लागणार आहे. नरेंद्र पवार हे रविवार कारंजा हा मूळ प्रभाग सोडून गंगापूररोडवर आले आहेत. तथापि, भाजपाचा समप्रित मतदार ही त्यांच्यासाठी सर्वाधिक जमेची बाजू आहे. तर मनसेचे सत्यम खंडाळे यांच्या दृष्टीने प्रभाग बऱ्यापैकी नवीन आहे. प्रभाग सात ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, त्यात भाजपाच्या हिमगौरी आडके अहेर यांना सुनीता गुळवे (शिवसेना), राणी देवरे (मनसे) व सुवर्णा गटकळ (कॉँग्रेस) यांच्यात लढत आहे. सुनीता गुळवे या मूळच्या कॉँग्रेस घराण्यातील. (कै.) गोपाळराव गुळवे यांच्या स्नुषा तर संदीप गुळवे यांच्या पत्नी आहेत. कॉँग्रेसचे घराणे असलेल्या संदीप गुळवे यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या राजकारणात पत्नीला उतरविले आहे. स्वत: संदीप गुळवे यांनी कॉँग्रेसकडून लढताना दोन वेळा पालिका निवडणुकीत पराभूत झाले होते. इगतपुरी तालुक्याच्या कर्मभूमीत मात्र त्यांना साथ लाभली आणि जिल्हा परिषदेत ते निवडूनही आले होते. अर्थात, महापालिका शिक्षण मंडळात त्यांनी सदस्यपदही भूषविले होते. क या सर्वधारण महिला गटात शिवसेनेच्या रंजना देसाई आणि भाजपाच्या स्वाती भामरे यांच्यात थेट लढत आहे. शिवसेनेचे शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती राजेंद्र देसाई यांच्या पत्नी असलेल्या रंजना देसाई प्रथमच निवडणूक लढवित असून, तेथे आमदार फरांदे यांच्या निकटच्या मानल्या गेलेल्या स्वाती भामरे दोन हात करणार आहेत. (प्रतिनिधी)