शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘रामसर’च्या यादीत नांदूरमधमेश्वर शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:32 IST

पाणथळ जागांचे आंतरराष्टÑीय स्तरावर संवर्धन करणाºया ‘रामसर’ संस्थेच्या यादीत आता महाराष्टÑही झळकणार आहे. नाशिकचे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व बुलढाण्याचे लोणार सरोवर ही दोन स्थळे आंतरराष्टÑीय दर्जाची असल्याचा विश्वास राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्तावामार्फत व्यक्त केला आहे.

नाशिक : पाणथळ जागांचे आंतरराष्टÑीय स्तरावर संवर्धन करणाºया ‘रामसर’ संस्थेच्या यादीत आता महाराष्टÑही झळकणार आहे. नाशिकचे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व बुलढाण्याचे लोणार सरोवर ही दोन स्थळे आंतरराष्टÑीय दर्जाची असल्याचा विश्वास राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्तावामार्फत व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच हा बहुमान राज्याला मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे.  पाणथळ जागांवर होणारे जैवविविधतेचे संवर्धन आणि त्याचा दर्जा लक्षात घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने आंतरराष्टÑीय पातळीवर महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी रामसर ही जागतिक पातळीवर संस्था प्रयत्नशील आहे. आंतरराष्टÑीय दर्जाची पाणथळ स्थळे भारतातील एकूण २६ पाणथळ जागांचा रामसरमध्ये समावेश आहे. यामध्ये महाराष्टÑाचा अद्याप प्रवेश झालेला नाही.  महाराष्टÑातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व येथील जैवविविधता व संवर्धनाच्या दृष्टीने हे राष्ट्रीय दर्जाचे पक्षी अभयारण्य आंतरराष्टÑीय स्तरावरदेखील मान्यता मिळवू शक ते, असा विश्वास सर्वप्रथम वनविभागाला (वन्यजीव) वाटला.वनविभागामार्फत राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनालाही खात्री पटली आणि शासनाकडून रामसरच्या मंजुरीसाठी केंद्राकडे अभयारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावात बुलढाणा जिल्ह्यातील खाºया पाण्याच्या लोणार सरोवराचाही समावेश आहे. रामसरच्या यादीत महाराष्टÑाला स्थान मिळवून देणारी पाणथळ स्थळे आहेत, याची खात्री राज्य शासनाला पटली आहे.  वर्षभरात याबाबत रामसर सचिवालयाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नांदूरमधमेश्वर-लोणार स्पर्धेतरामसरच्या यादीत महाराष्टÑातून नाशिकचे नांदूरमधमेश्वर व बुलढाण्याचे लोणार सरोवर यांच्यात स्पर्धा आहे. दोन्ही स्थळेही आगळीवेगळी व वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहेत. नांदूरमधमेश्वरला ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी राज्याचे भरतपूर असे म्हटले आहे तसेच राष्टÑीय पक्षी अभयारण्याचा दर्जाही या पाणथळ जागेला प्राप्त झाला आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पक्ष्यांचे संमेलन या जागेवर भरते. त्यामुळे देशभरातील पक्षीप्रेमींचे हे पसंतीचे स्थळ बनले आहे. तसेच महाराष्टÑाच्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून लोणार लोकप्रिय आहे. त्यामुळे रामसर सचिवालयाकडून कोणत्या पाणथळ जागेवर शिक्कामोर्तब होईल याची उत्सुकता आहे. दोन्हीपैकी कोणतेही एक पाणथळ स्थळ हे आंतरराष्टÑीय दर्जाचे म्हणून रामसरकडून निवडले गेले तरी महाराष्टÑाचा प्रवेश यानिमित्ताने आंतरराष्टÑीय स्तरावर होईल असे मानले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक