शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे : चालकाने दाखविले प्रसंगावधान; धावती कार बेचिराख वावी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:45 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ शिवारात शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान नांदूरशिंगोटेकडे येणाºया स्कोडा कारने पेट घेतला.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ शिवारात शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान नांदूरशिंगोटेकडे येणाºया स्कोडा कारने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतून तिघेजण सुखरूप बाहेर पडले. अवघ्या काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील मºहळ बुद्रुक शिवारात निरजंन कुºहे यांच्या वस्तीसमोर हा प्रकार मध्यरात्री घडला. नाशिक येथील उपनगर येथे राहणारे पराग सुभाष सानप (१९) हे आपले मित्र किरण हरिभाऊ जगझाप व सुशांत दिनकर काकड यांच्यासह स्कोडा लोरा कार क्र मांक एमएच ०४ बीएम ६३६३ हिने शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. शिर्डी येथील देवदर्शन आटोपून वावी मार्गाने नांदूरशिंगोटे येथे येत होते. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास चालक किरण जगझाप मºहळ शिवारात आले असता डेस्क बोर्डावरील मीटरचे काटे फिरत नाही तसेच सेंसरचा आवाज येत असल्याचे लक्षात आले व बोनेटमधून धूर दिसू लागताच इतर दोघामित्रांना सांगून कार रस्त्याच्या कडेला उभी करून तिघेही बाहेर पडले. जवळपास असणाºया नागरिकांना मदतीसाठी आवाज दिला. शेजारच्या वस्तीवरून पाण्याचे पिंप आणेपर्यंत काही क्षणातच कारचा भडका झाला. सानप यांच्यासमोर कार खाक होत होती. रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. वेळेत कारच्या बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. अवघ्या काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली.रात्री : दोन वाजेच्या सुमारास मदतकार्ययावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूला असणारे नागरिक जागे झाले व त्यावेळी त्यांना नागरिकांनी धीर दिला. सानप यांनी नांदूरशिंगोटे येथील नातेवाईक तुषार शरद सानप यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपक बर्के, संदीप भाबड, विश्वास भाबड यांच्यासह मºहळ येथे पोहोचले. रात्री दोन वाजेच्या सुमारास तिघेही नांदूरशिंगोटे येथे आले. पराग सानप यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात रविवारी अकस्मात जळतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.