शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नांदूर-मानूरच्या शेतकऱ्यांचा हरित विकास क्षेत्राला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:51 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मानूर शिवारात हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) योजना मखमलाबाद येथे होत नसेल तर हा प्रकल्प मानूर येथे राबविण्याची उपसूचना नगरसेवकांनी केली असली तरी स्थानिक शेतकरी याबाबत अनभिज्ञ असून, पिवळ्या पट्ट्यात असलेल्या शेतकºयांनी या प्रकल्पाला विरोधाचा सूर आळवला आहे.

आडगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत मानूर शिवारात हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) योजना मखमलाबाद येथे होत नसेल तर हा प्रकल्प मानूर येथे राबविण्याची उपसूचना नगरसेवकांनी केली असली तरी स्थानिक शेतकरी याबाबत अनभिज्ञ असून, पिवळ्या पट्ट्यात असलेल्या शेतकºयांनी या प्रकल्पाला विरोधाचा सूर आळवला आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत मानूर शिवारात हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) योजना येथे राबविण्याची उपसूचना भाजप नगरसेवक उद्धव निमसे यांनी मांडली आहे. नांदूर व मानूर येथील कोणत्या जमिनींवर हा प्रकल्प कसा राबविला जाणार याबाबत शेतकºयांना काहीच माहिती नसून, नुकत्याच विकास आराखड्यात पिवळ्या पट्ट्यात समाविष्ट करण्यात आलेल्या शेतकºयांचा या योजनेला विरोध आहे.या संदर्भात काही शेतकºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी हॉटेल जत्रा ते नांदूर रस्त्यामुळे या परिसराचा विकास झाला असून, या भागात शेती व शेतीपूरक व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरू आहे. शिवाय विकास आराखड्यात येथील जमिनींचा पिवळ्या पट्ट्यात समावेश झाल्यामुळे शेतजमिनींना सोन्याचे मोल आले आहे.अशा परिस्थितीत हरित विकास क्षेत्रासाठी जमिनी कशा देणार असे, मत त्यांनी व्यक्त केले. तर हिरव्या पट्ट्यातील जमिनीवर हरित क्षेत्र विकास योजना राबविणार असतील तर शेतकरी विरोध करणार नाही, असे मतही व्यक्त करण्यात आले. काहींनी याबाबत शेतकºयांना अगोदर विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.ग्रीन फिल्ड योजनेबाबत अजून कोणतीही माहिती नाही पण आमच्या वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत, शिवाय नुकत्याच आमच्या शेतजमिनींचा विकास आराखड्यात पिवळ्या पट्ट्यात समावेश करण्यात आला असल्याने शेती सुरू आहे त्यामुळे आमच्या शेत जमिनींवर कुठल्याही प्रकारची योजना राबविली जाऊ नये.  - प्रकाश माळोदे, शेतकरीस्मार्ट सिटी योजनेबाबत अजून कुठलीही माहिती नाही, पण या परिसराच्या विकासात भर पडणारी शेतकºयांच्या हिताची योजना असल्यास आमचा पाठिंबा असेल, पण अजून आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. शिवाय नगरसेवकांनीदेखील काही माहिती दिलेली नाही.  - दिगंबर माळोदे, शेतकरी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी