नांदगाव : शहर व परिसरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणेश मंडळांच्या संख्येत दीडपट वाढ झाली असून, शहरातील मानाच्या गणेशाची छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळातर्फे स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभर बाजारात गणेशमूर्ती खरेदीची लगबग दिसून आली. दुपारपासूनच लहान मंडळांनी साध्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणरायाला आणले. यंदा शहर व ग्रामीण भागात एकूण ९२ मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यात २७ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. नांदगाव शहरात एकूण १६ मोठी मंडळे आहेत, तर ग्रामीण भागात मोठ्या मंडळांची संख्या चार आहे, तर लहान मंडळांची संख्या ४५ आहे. (वार्ताहर)
नांदगावी यंदा गणेश मंडळांच्या संख्येत वाढ
By admin | Updated: September 8, 2016 00:40 IST