शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

नांदगाव : पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; एका दिवसात महिला, बालकांसह दहा जणांना घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:59 PM

नांदगाव : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पिसाळलेल्या कुत्र्याची दहशतएका दिवसात महिला, बालकांसह दहा जणांना घेतला चावा

नांदगाव : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.पिसाळलेला कुत्रा एखाद्या हिंस्त्र जंगली श्वापदाप्रमाणे अचानक पाठीमागून येऊन मान व गळा यावर हल्ला करतो. त्याच्या या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी दूध आणण्यासाठी जात असलेल्या इसमावर कुत्र्याने हल्ला केला. मल्हारवाडी ते वडाळकर वस्तीकडे जाणाºया भागात कुत्र्याने चावे घेतल्याची नोंद आहे. आनंदा दाभाडे यांच्या कपाळावर आठ टाके पडले आहेत.देवचंद गोराडे, प्रकाश जाधव, पुष्पा नागरे, सारिका गुढेकर, शीला पवार यांच्यासह गंभीर इजा झालेल्यांची नावे आनंदा दाभाडे, केवळबाई पाटील, राजीव थोरात, राहुल पवार. आंबेडकर चौकात राहुल गाडीतून खाली उतरला आणि दोन पावले चालला नाही तोच त्याला कुत्र्याने जखमी केले.शहरात कुत्र्यांची संख्या वाढली असून, दिवसा व रात्री त्यांच्या टोळ्या गल्लोगल्ली अनिर्बंध फिरत असतात. त्यांच्यातले टोळीयुद्ध सुरू झाले की, रस्त्यावरून भरधाव एकमेकांचा पाठलाग करणारी कुत्री पादचाºयांच्या मनात भीती उत्पन्न करतात. पळता पळता ती अंगावर येतात. मग महिला व मुलांची त्रेधातिरपीट उडते. रात्री बाहेरगावाहून कोणी आले तर रस्त्यातल्या भयंकर कुत्र्यांपासून जीव मुठीत धरून घरी जावे लागते. ही कुत्री कधी कधी अकारण भुंकत अंगावर येतात.कुत्र्यांप्रमाणेच मोकाटगायींची संख्या वाढते आहे. गोप्रेमींकडून मिळालेल्या अन्नावर त्यांची गुजराण होते. मालकाला आयते दूध मिळते. त्या पुलावर बसून रहदारीला अडथळा निर्माण करतात. समूहाने फिरणाºया गायी रात्री गव्हाच्या शेतांमध्ये जाऊन पिकांचे नुकसान करतात. पूर्वी कोंडवाडा होता. आता तोही नाही. पुलावर व शहरातील रस्त्यांवर जागोजागी शेणपडलेले असते. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, नगरपरिषदेच्या कर्मचाºयांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.- विश्वंभर दातीर, मुख्याधिकारी

टॅग्स :dogकुत्राNashikनाशिक