शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी शासकीय यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:22 IST

नांदगाव : तालुक्यातील आमोदे येथील व्यक्तीचा खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीने चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार घेतल्याने तेथील डॉक्टर व परिचारिका आदी २३ जणांचे नमुने धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती चाळीसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नांदे यांनी दिली. यामुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.

नांदगाव : तालुक्यातील आमोदे येथील व्यक्तीचा खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीने चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार घेतल्याने तेथील डॉक्टर व परिचारिका आदी २३ जणांचे नमुने धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती चाळीसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नांदे यांनी दिली. यामुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.आमोदे गावातील २०० घरे कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले असून, बफर झोन (कमी तीव्रतेचा) व कंटेन्मेंट झोनमध्ये तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या प्रत्येकी पाच टीम दोन्ही झोनमध्ये कार्यरत झाल्या आहेत.कंटेन्मेंट झोनमध्ये दर दिवशी ५० घरे याप्रमाणे पुढील १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी दिली. घरातील तीन व्यक्ती, एक गरोदर महिला व शेजारची तीन बालके उच्च धोक्याच्या पातळीवर असून, आजूबाजूच्या घरातील २० लोकांची आरोग्य तपासणी वेहेळगाव प्राथमिक केंद्राचे डॉ. अरविंद माहुलकर व नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांनी केली आहे. त्यात कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. एकूण १२ जणांना घरात विलगीकरण करण्यात आले असून, पॉझिटिव्ह व्यक्तीबरोबर गेलेल्या दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.-----------------------------घरात विलगीकरण४कोरोनाबाधित व्यक्तीची पिठाची गिरणी असून, गेल्या १४ दिवसात ज्यांनी त्यांच्याकडून दळण करून घेतले आहे अशा व्यक्तींचा सर्व्हे करून त्यांचे १४ दिवसांसाठी घरात विलगीकरण करण्यात येणार आहे. आमोदे गावाचा मालेगाव शहराशी व्यापारी संबंध आहे. प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांची टीम जातीने लक्ष देऊन आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक