शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

नांदगाव : सभापतीपदी भाऊसाहेब हिरे, उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 15:27 IST

नांदगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब हिरे व उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला व हार गुच्छ देऊन दोघांचा सत्कार केला.

नांदगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब हिरे व उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला व हार गुच्छ देऊन दोघांचा सत्कार केला. पंचायत समिती सभापती विद्यादेवी पाटील यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक घेण्यात आली. आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडल्याची माहिती ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी दिली.सभापती पदासाठी दोन उमेदवारांची नावे चर्चेला होती. अखेर मांडवड गणातील भाऊसाहेब हिरे यांच्या नावावर एकमत झाल्रे. यापूर्वी भाऊसाहेब हिरे उपसभापती होते. या निवडीमुळे त्यांना बढती मिळाली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पानेवाडी गणातून भाजपच्या तिकिटावर साहेबराव नाईकवाडे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुशीलाबाई नाईकवाडे या अपक्ष बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र उपसभापती पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पंचायत समितीच्या आठ सदस्यांमध्ये आता भाजपचे दोन सदस्य उरले आहेत.भाऊसाहेब हिरे हे बाजार समितीचे संचालक आहेत. बाजार समितीच्या राजकारणात त्यांचे वडील विठ्ठल हिरे यांचे महत्वाचे स्थान होते. त्या काळात त्यांना सभापती पदाची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी जिद्दीने राजकारणात आपल्या मुलाला आणून त्याला पंचायत समितीचा सभापतिपद देण्यात मोठी भूमिका बजावली. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व नवीन प्रकल्प आणण्यासाठी आपल्या कारिकर्दीत प्रयत्न करू असे भाऊसाहेब हिरे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक