नाशिक : येथील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीत नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलने बाजी मारली असून, सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून २४ वर्षांपासूनची सत्ता कायम राखली आहे.या निवडणुकीसाठी शरद काळे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलशी त्यांची लढत झाली. या निवडणुकीत सकाळी मतदान झाले आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी घेण्यात आली. यावेळी सर्वसाधारण गटातून नम्रता पॅनलचे दिगंबर गवळी, धोंडीराम घुगे, सुधाकर गोर्हे, बापूराव कुलकर्णी, कैलास निरगुडे, अनिल पाटील, प्रकाश पगार, विष्णू पिंगळे, भगवान शिंदे, मधुकर साळवे, बापूराव ठाकूर, काशीनाथ वाघ, महिला गटातून जिजाबाई अहिरे, करुण जाधव, अनुसूचित जातीजमाती गटातून अरुण दोंदे, इतर मागासवर्ग गटातून रवींद्र पाटील तर भटक्या विमुक्त गटातून अतुल कारंजे यांनी विजय मिळवला. परिवर्तन पॅनलला खातेही खोलता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी काम बघितले. विजयी उमेदवारांची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेत ‘नम्रता’चे वर्चस्व
By admin | Updated: June 2, 2016 23:23 IST