शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रस्त्याचे दोन महिन्यात बदलले नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:19 IST

दोन अडीच महिण्यांपुर्वी पेठ शहरातील जून्या बसस्टॅन्ड पासून सुरू होणाऱ्या जोगमोडी रस्त्याच्या झालेल्या नामकरणावरून उद्भवलेल्या वादावर आदिवासी क्रांतीदिनी दुसºयांदा नामकरण झाल्याने सद्या तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवादावर पडदा : पेठ जोगमोडी चौक व मार्गाला क्र ांतीकारक देवाजी राऊत यांचे नाव

पेठ : दोन अडीच महिण्यांपुर्वी पेठ शहरातील जून्या बसस्टॅन्ड पासून सुरू होणाऱ्या जोगमोडी रस्त्याच्या झालेल्या नामकरणावरून उद्भवलेल्या वादावर आदिवासी क्रांतीदिनी दुसºयांदा नामकरण झाल्याने सद्या तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे.पेठ शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या या चौकाला आदिवासी क्रांतीकारक देवाजी राऊत यांचे नाव देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाचा फलक कोठेही लावण्यात आला नव्हता. दोन मिहण्यापुर्वी डांग सेवा मंडळाचे सचिव स्व. विजय बिडकर यांच्या स्मरणार्थ या रस्त्याला आदरणीय विजय बिडकर मार्ग असे नामकरण करून तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते नामफलकाचे अनावरणही करण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यावर अखिल भारतीय आदिवासी एकता परिषद व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत. सदरचे नामकरण रद्द करून क्रांतीकारक देवाजी राऊत यांचे नाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावर सोशल मिडीयावर मोठया प्रमाणावर चर्चेच्या फैरी व आरोप प्रत्यारोपही झाले.अखेर ९ आॅगष्ट क्रांती दिन व आदिवासी गौरव दिनाच्या पाशर््वभूमीवर पुर्वीचा फलक काढून आदिवासी क्रांतीवीर देवाजी राऊत चौक व मार्ग असे दुहेरी नामकरण करण्यात आले. यामुळे सद्या तरी या प्रकरणावर पडदा पडला असला तरी एकाच चौकात दोन वेळा नामकरण सोहळा झाल्याने व दोन्ही सोहळ्यांना तेच लोकप्रतिनिधी उपस्थित असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.आदिवासी एकता परिषद व युवक कॉग्रेसच्या मागणीमुळेच नामकरण बदलण्यात आल्याचा कार्यकर्त्याकडून दावा केला जात आहे तर संपुर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊनक्रांतीवीर देवाजी राऊत यांचे नाव देण्यात आल्याने याचे कोणत्याही राजकी पक्ष अथवा संघटनेने श्रेय लाटू नये अशाही भावना व्यक्त केल्या जात आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNashikनाशिक