शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

संजीवन समाधी सोहळ्यात माउलींच्या नावाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:09 IST

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाचा कार्यक्रमदेखील झाला.

नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाचा कार्यक्रमदेखील झाला.यावेळी भक्तपरिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात रविवारी काकड आरती करण्यात आली. तालासुरात झालेल्या माउलींच्या आरतीने आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या गजराने रविवारी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पहाटे काकड आरतीप्रसंगी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. सकाळच्या काकड आरती सोहळ्यापासून सुरू झालेलीसोमवारी सकाळी ९.३० वाजता कैलास महाराज वेलजाळी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. रविवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची मंदिरात रीघ लागली होती.संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गत आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी देवता पूजन आणि पुण्याह वाचन तसेच ज्ञानेश्वरी पारायण आणि महिलांचे भजन असा सोहळा पार पडला. दरम्यान, भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहापासून बीडच्या अनिता चिंचपूरकर यांचे संतचरित्र या विषयावरील कीर्तन रंगले. त्याशिवाय अमृतानुभव पारायण, दशस्कंद भागवत पारायण, भजने, हरिपाठाचे अभंग नित्यनेमाने सादर केले जात होते. त्याशिवाय सोमवारच्या काल्याच्या कीर्तनाने या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिराचे पुजारी पांडुरंग शौचे आणि परिवारासह सर्व भक्त परिवाराने भाविकांसाठी सुविधांची पूर्तता केली.रविवारी दिंडी सोहळा, समाधी अभंग, आरती आणि महाप्रसाद, गीता पाठ असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले, तर सायंकाळी रसिका जोशी-भिडे आणि भक्ती नांदुर्डीकर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक