शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’च्या नावाने तीघांना भामट्यांनी घातला लाखोंना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:59 IST

तिघांना चक्क ‘ईडी’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देदामदुप्पट रकमेच्या आमिषापोटी आर्थिक फसवणूक भामट्यांनी सुध्दा ‘ईडी’नावाचा आधार घेतला

नाशिक : ‘ईडी’ शब्द सध्या सर्वत्र चांगलाच गाजत आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ‘ईडी’ अधिकच प्रकाशझोतात आली. सोशलमिडियावरही ‘ईडी’च्या अधारे विविध पोस्ट व्हायरल झाल्या. अनेकांनी ‘ईडी’ शब्दाचा प्रयोग करून चक्क विनोदही सोशल मिडियावर रंगविले. एकूणच मागील महिनाभरापासून ‘ईडी’ची चर्चा असल्याने सिन्नर तालुक्यातील दोघा भामट्यांनी सुध्दा ‘ईडी’नावाचा आधार घेत एक ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे तीघांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.दामदुप्पट रकमेच्या आमिषापोटी अद्यापही नागरिक आपली आर्थिक फसवणूक करून घेत आहे. मंदी असो किंवा तेजी कोणीही स्वत:चे आर्थिक नुकसान करून कधीही इतरांना जादा लाभ करून देत नाही, हे सर्वश्रुत आहे. तरीदेखील आमिषाला बळी पडून नागरिक लाखो रुपयांची गुंतवणूक करत बळी पडत आहे. दोघा भामट्यांनी अशाचप्रकारे तिघांना चक्क ‘ईडी’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर तालुक्यातील वावी गावातील दोघे संशयित सतीश बनसोडे (३५) व सचिन वेलजाले (३६) यांनी फिर्यादी सीमा भाऊसाहेब काळे (३२, रा. आळे फाटा, नारायणगाव) यांच्यासह संदीप काठे, संदीप लामखेड यांना प्रत्येकी अनुक्रमे २ लाख, ३ लाख आणि १ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यासाठी दोघा भामट्यांनी त्यांना ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे दामदुप्पट रक्कम केवळ आठ दिवसात देण्याचे आमिष दाखविले. तिघांचा विश्वास संपादन करून या भामट्यांनी फिर्यादी काळे यांच्यासह काठे व लामखेडे यांच्याकडून गुंतवणुकीची रक्कम ‘गुगल पे’द्वारे आॅनलाइन स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली. यानंतर तिघा पीडितांनी त्यांच्याशी आठवडाभरानंतर वारंवार संपर्क साधला; मात्र संबंधित दोघा भामट्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे यांच्या लक्षात आले. काळे यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून संशयित दोघांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बनसोडे व वेलजाले यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक वºहाडे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfraudधोकेबाजीPolice Stationपोलीस ठाणेEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखा