शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचे नाव घेत दराडेंचे एका दगडात दोन पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:10 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयात छगन भुजबळ यांचे सहकार्य लाभल्याचे केलेले वक्तव्य व त्यानंतर लागलीच भुजबळ समर्थकांकडून त्याचे खंडण करण्यात आले असले तरी, दराडे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यामागची कारणे शोधली जात आहेत. दराडे यांनी आपल्या विजयात भुजबळांना ओढून एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयात छगन भुजबळ यांचे सहकार्य लाभल्याचे केलेले वक्तव्य व त्यानंतर लागलीच भुजबळ समर्थकांकडून त्याचे खंडण करण्यात आले असले तरी, दराडे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यामागची कारणे शोधली जात आहेत. दराडे यांनी आपल्या विजयात भुजबळांना ओढून एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांचे नाव घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. मुळात या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्याशी दराडे यांची सरळ लढत होती.  सहाणे यांनी भुजबळ यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी आशीर्वादही मागितल्यावर भुजबळ यांनी ‘पक्षाची उमेदवारी हाच आशीर्वाद’ असे सांगून सहाणे यांच्या पाठीशी पक्ष उभा राहणार असल्याचे जाहीर केले होते. असे असतानाही दराडे यांनी भुजबळ यांना विजयाचे श्रेय देण्यामागच्या राजकारणाची चर्चा होऊ लागली आहे. भुजबळ यांचे ओबीसी समाजाप्रती असलेले प्रेम पाहता त्यांचा कौल आपल्यालाच मिळाल्याचे दाखविण्यात दराडे ज्याप्रमाणे यशस्वी झाले त्याचप्रमाणात या निवडणुकीत जातीयवादी प्रचार करणाऱ्यांना त्यांनी भुजबळ यांचे नाव घेत चोख उत्तर दिल्याचे मानले जात आहे.शिवसेनेने या विजयाचे श्रेय एकट्याकडे न घेता, भुजबळांशी असलेल्या सख्यामुळे विजय सोपा झाल्याचे दाखविण्याचा दराडे यांनी प्रयत्न केला आहे. दराडे हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार असले तरी, त्यांची मातृभूमी येवला विधानसभा मतदारसंघ असून, गेल्या दहा वर्षांपासून छगन भुजबळ हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, अशा परिस्थितीत भुजबळ यांना विजयाचे श्रेय न देता दराडे यांना येवला मतदारसंघात काम करणे अवघड होऊन बसणार आहे. त्यामुळे विजयाचे श्रेय व मोठेपण भुजबळ यांना देऊन दराडे यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल आणखी सुकर करून घेतल्याचाही त्यातून अर्थ काढला जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMLAआमदार