शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील संपात शंभर टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:47 IST

नाशिक : केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण घेत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने केंद्राच्या या धोरणाला विरोध ...

नाशिक : केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण घेत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने केंद्राच्या या धोरणाला विरोध करण्याबरोबरच कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.८) नाशिकमध्येहीसंप पुकारण्यात आला. यावेळी हजारो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या या संपात हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, या संपात शासकीय आणि निमशासकीय तसेच कंत्राटी कर्मचाºयांचा शंभर टक्के सहभाग असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.बुधवारी (दि.८) कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. या संपात जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक शासकीय, निमशासकीय सेवेतील कामगार सहभागी झाले होते. गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी केंद्र शासनाविरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा दिल्या. शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी कामगार प्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त करीत या संपाने केंद्राला जाग आली नाही, तर बेमुदत संपाचा इशारा दिला.कामगार वाचविण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी एकत्र येत बुधवारी देशव्यापी संप पुकारला. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी, खासगी उद्योगातील कामगार, कंत्राटी कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि अधिकारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप