नाशिक : गुजरातसह दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने या राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. ओझर विमानतळावर सुरू असलेल्या तपासणीत आत्तापर्यंत तीन प्रवासी कोरोनाबाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. हे दोन्ही प्रवासी मूळ नाशिककर असले तरी त्यातील एक दिल्लीतून, तर दोन जण अहमदाबाद येथून परतले आहेत. दरम्यान, या तिघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढीचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.
अहमदाबाद, दिल्लीहून आलेल्या तिघांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:11 IST
नाशिक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढीचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.
अहमदाबाद, दिल्लीहून आलेल्या तिघांना कोरोना
ठळक मुद्देतपासणी : प्रवाशांना ओझर विमानतळावरच रोखले