शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव घाटात कामगारास अडवून लूट; सिनेस्टाईल पाठलाग अयशस्वी ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2023 12:07 IST

सिन्नरहून देशवंडीकडे पीकअप ने घरी जाणाऱ्या रवी मेंगाळ या तरूणाच्या हा प्रकार लक्षात आला.

दत्ता दिघोळे

नायगाव ( सिन्नर ) - तालुक्यातील नायगाव घाटात शनिवारी ( दि.२२ ) रात्री माळेगाव एमआयडीसीतील कामगारास आडवून चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली. शेतकरी प्रवाशाने चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केल्याने चोरटे मोटारसायकल सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील सोनगिरी येथिल संजय उर्फ सजन विठोबा लहाने हे माळेगाव एमआयडीसीतील गँस कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर रात्री ९ वाजेच्या दरम्यान घराकडे निघाले होते.सिन्नर - नायगाव रस्त्यावरील घाटातील शेवटच्या वळणावर असतांना एका मोटारसायकलवर आलेल्या तीघांनी त्यांना आवाज देत थांबण्यास सांगितले मात्र त्यांनी न थांबता गाडीचा वेग कमी केला.एवढया वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवून झटापटी केली.त्यांच्या खिशातील पंधरा हजार रूपये व मोबाईल हिसकावून घेतला.

दरम्यान सिन्नरहून देशवंडीकडे पीकअप ने घरी जाणाऱ्या रवी मेंगाळ या तरूणाच्या हा प्रकार लक्षात आला.त्याने पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग केला.सुमारे दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आव्हाड वस्तीवरील वळणावर चोरट्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले.आपल्याला पकडले जाण्याच्या भीतीने तीघा चोरट्यांनी मोटारसायकल ( क्रमांक एम.एच.-१५ -बी.वाय.९२७९ )   सोडून चोरट्यांनी तेथून डोंगराच्या दिशेने पळ काढला.चोरट्यांनी सोडून दिलेली पल्सर ही चोरीची  असल्याचे कळते.अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहे. दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक श्याम निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली.परिसरात शोधाशोध केली मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

नायगाव घाटात मोटारसायकलस्वारांना आडवून लुटण्याच्या घटना वाढू लागल्याने कामगाव व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची माहिती परिसरात सोशलमिडीयाच् माध्यमातून कळताच खळबळ उडाली.या परिसरातील शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागुन काढली.