शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर नगरपंचायती होणार मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:34 IST

आगामी वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्याने आत्तापासूनच सत्ताधारी पक्षाने तयारी सुरू केली असून, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देऊन त्या माध्यमातून जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

नाशिक : आगामी वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्याने आत्तापासूनच सत्ताधारी पक्षाने तयारी सुरू केली असून, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देऊन त्या माध्यमातून जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नगरपालिका, नगरपंचायतींना लवकरच नगरोत्थान व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता शासकीय पातळीवर व्यक्त केली जात असून, त्याकाळात नवीन कामांचा शुभारंभ अथवा योजनांची सुरुवात करण्यात अडचणी निर्माण होणार असल्यामुळे शासनाने सर्वच नगरपालिका व नगरपंचायतींकडून नगरोत्थान योजनेंतर्गत नवीन कामांचे प्रस्ताव मागविले होते, त्याचबरोबर नगरपंचायतींनादेखील वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. नगरोत्थान योजनेंतर्गत नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीत रस्ते, पाणी, गटार, पथदीप या कामांना प्राधान्य देण्याचे तर वैशिष्ट्यपूर्ण कामांमध्ये नवीन योजना राबविण्याच्या सूचना आहेत. तसे प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर शासनाने निधी मंजूर केला असून, जिल्हा पातळीवर नगरपालिका शाखांना नगरपालिका, नगरपंचायतींची लोकसंख्या तसेच कामांची निकड पाहून निधी वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकांचा माहोल लक्षात घेऊन सदर कामांची अंदाजपत्रके, निविदा काढून लवकरात लवकर कामे सुरू करण्यावर भर देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. नाशिक जिल्ह्णात भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मनमाड, नांदगाव, सिन्नर, येवला, सटाणा या नगरपालिका तर देवळा, चांदवड, कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या नगरपंचायतींसाठी शासनाने नगरोत्थान योजनेंतर्गत १६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, यापूर्वी काही नगरपालिका व नगरपंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी सुमारे दोन ते तीन कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्यामुळे १६ कोटी रुपये वाटप करताना यापूर्वी कोणत्या नगरपालिका, नगरपंचायतींना विविध योजनेंतर्गत निधी देण्यात आला त्याचा विचार करण्यात येणार आहे. निधी वाटपात समतोल साधण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.नगरपंचायती  निधीसाठी अधीरशासनाने नगरोत्थान व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी निधी मंजूर केला असताना जिल्हा प्रशासनाकडून निधी वितरित होणारा विलंब पाहून नगरपंचायती, नगरपालिकांचे पदाधिकारी सैरभैर झाले आहेत. आगामी काळात निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यास कामे रखडतील, असे समर्थन त्यांच्याकडून केले जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत