शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत-जिल्हा परिषदेच्या वादात अंगणवाड्या अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 18:16 IST

नाशिक जिल्ह्यात सुमारे चार हजारांहून अधिक अंगणवाड्या असून, आजही त्यांचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाकडे आहेत. या अंगणवाड्यांमधील बालकांची वैद्यकीय तपासणी, पोषण आहाराचे वाटप, शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी सेविका, कार्यकर्तीकडे सोपविण्यात

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी चालढकल : चार वर्षांपासून शासनस्तरावरही उदासीनता

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर अशा नगरपंचायतीत पूर्वीपासूनच समाविष्ट असलेल्या अंगणवाड्यांची गेल्या चार वर्षांपासून दुरवस्था झाली असून, शासन निर्णयानुसार नगरपंचायतींनी या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या असल्याचे ठरवून त्यांना सुविधा पुरविण्यास नकार दिला आहे, तर जिल्हा परिषदेनेदेखील अंगणवाड्या नगरपंचायतीत भरत असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कधी नगरपंचायतींकडून या अंगणवाड्यांवर दावा करण्यात आला, तर कधी जिल्हा परिषदेने या अंगणवाड्यांसाठी आपला टाहो फोडला परंतु पदरी अपयशच पडले आहे.

नाशिक जिल्ह्यात सुमारे चार हजारांहून अधिक अंगणवाड्या असून, आजही त्यांचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाकडे आहेत. या अंगणवाड्यांमधील बालकांची वैद्यकीय तपासणी, पोषण आहाराचे वाटप, शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी सेविका, कार्यकर्तीकडे सोपविण्यात आलेली आहे. असे असताना शासनाने जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींमधील वाढती लोकसंख्या लक्षात घेता २०१५ मध्ये त्यांचे नगरपंचायतीत रूपांतर केले. त्यात निफाड, दिंडोरी, देवळा, चांदवड, कळवण, पेठ, सुरगाणा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शासनाने नगरपंचायतींसाठी प्रभाग व आरक्षण टाकून नगरसेवक निवडीसाठी निवडणूकही राबविली. नगरपंचायतींना स्वतंत्र निधी व त्यांची स्वायत्तता कायम ठेवतानाच त्यांच्या कामांची कार्यकक्षा ठरवून देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीच्या हद्दीत पूर्वीपासून असलेल्या अंगणवाड्यांची जबाबदारी मात्र अधांतरी ठेवण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या हद्दीत अंगणवाडी असल्यामुळे तिच्या देखभाल, दुरुस्तीच्या विषयातून जिल्हा परिषदेने अंग काढून घेतले आहे, तर अंगणवाडीची जागा व अंगणवाडीची मालकी जिल्हा परिषदेची असल्यामुळे नगरपंचायतींनीदेखील परवास्तुवर खर्च कसा करायचा, असा सवाल उपस्थित केला आहे. परिणामी गेल्या चार वर्षांपासून नगरपंचायतींच्या हद्दीतील अंगणवाड्यांची हेळसांड होत आहे. काही अंगणवाड्या मोडकळीस आल्या असून, काहींचे पत्रे उडाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अशा धोकादायक अंगणवाड्यांमुळे मुलांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत शासन पातळीवरूनदेखील दखल घेतली जात नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देवळ्याच्या सदस्या नूतन आहेर यांनी हा प्रश्न उपस्थित करून अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे नूतन आहेर यांच्या सासू देवळा नगरपंचायतींच्या सदस्या असल्यामुळे घरातल्या घरातच अंगणवाडीची देखभाल, दुरुस्ती कोणी करावी यावरून प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद