शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडचा कांदा दिल्ली, भुवनेश्वरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:07 IST

शेखर देसाई।लासलगाव : कांदा भावात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेल्या १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, सहा महिन्यांपासून हा ...

ठळक मुद्देवातावरण बदलाचा फटका : दररोज १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान

शेखर देसाई।लासलगाव : कांदा भावात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेल्या १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, सहा महिन्यांपासून हा कांदा खरेदी होत असल्याने त्यामध्ये दररोज होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आणि नुकसान होत आहे. ज्यावेळी संपूर्ण चाळीमधून कांदा बाहेर काढण्यात येईल त्यावेळेसच नुकसानीची आकडेवारी समोर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.कांद्याच्या भावात चढ-उतार झाल्यानंतर समतोल ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेड मार्फत कांदा स्थिरीकरण फंड अंतर्गत कांदा खरेदी दर वर्षी करण्यात येते. या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नाफेडने साडेतेरा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. तो आता विविध राज्यात नाफेडचे तसेच मद्यथेअरीमार्फत पाठविला जात आहे. कांद्याचे घसरते दर आटोक्यात राहावे व ग्राहकाला योग्य दरात कांदा उपलब्ध व्हावा, या हेतूने तसेच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आतापर्यंत तब्बल १३ कोटी रु पये खर्च करून १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. शेतमालाच्या दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाने सुचविलेल्या भाव स्थिरीकरण निधी योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. त्यातून या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. घाऊक बाजारात भाव घसरू नयेत, म्हणून नाशिक,नगर, पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून नाफेडने हा कांदा खरेदी केला आहे. केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा रवाना करण्यासाठी चाळीतून बाहेर काढला जात आहे. यातील वजनातील घट व हवामानाचा परिणाम यामुळे कांदा किती खराब निघतो हे लवकरच समजेल.- नानासाहेब पाटीलसंचालक, नाफेड