शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'नॅब'चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : दृष्टिबाधितांना मिळणार हक्काचा ‘निवारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:50 IST

समाजातील दृष्टीबाधित ज्येष्ठांसह डोळस ज्येष्ठांकरिता वृध्दाश्रम उभारले जात आहे. या वृध्दाश्रमाच्या आणि वसतीगृहाच्या मिळून सुमारे ४० खोल्यांची अदयावत इमारत साकारली जात आहे.

ठळक मुद्देदृष्टीबाधितांकरिता वसतीगृह व वृध्दाश्रम उभारण्याचा प्रकल्प हाती दानशूर व्यक्तींनी संस्थेला या प्रकल्पासाठी मदत करावी

नाशिक : दृष्टिबाधितांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाडच्या वतीने शहराजवळील बेळगाव ढगा शिवारात हक्काचे वसतीगृह उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. याबरोबरच दृष्टिबाधित ज्येष्ठ व डोळस ज्येष्ठ नागरिकांनाही संस्थेकडून निवासाची व्यवस्था वृध्दाश्रमाद्वारे करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष निर्मला शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.गंगापूररोडवरील राका कॉलनीमध्ये असलेल्या ‘नॅब’ कार्यालयात पत्रकारांशी पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी माजी अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाशचंद सुराणा यांनी नॅबच्या कार्याचा आढाव घेताना सांगितले. तत्कालीन अध्यक्षपदी असताना समाजाकडून आलेल्या मदतीच्या हातातून मिळालेल्या निधीची बचत दुरदृष्टी ठेवून केली. या निधीमधूनच ५४ गुंठे जागा संस्थेला खरेदी करता आली. या जागेवर दृष्टीबाधितांकरिता वसतीगृह व वृध्दाश्रम उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला गेला आहे. या प्रकल्पामध्ये केवळ वास्तू नसून सर्वच भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.समाजातील दृष्टीबाधित ज्येष्ठांसह डोळस ज्येष्ठांकरिता वृध्दाश्रम उभारले जात आहे. या वृध्दाश्रमाच्या आणि वसतीगृहाच्या मिळून सुमारे ४० खोल्यांची अदयावत इमारत साकारली जात आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकीतून संस्थेला या प्रकल्पासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी सचिव शितल सुराणा यांनी केले. संस्थेने स्वखर्चाने सुमारे पावणेदोन कोटी रूपये खर्च करून जमिनीची खरेदी केली असून बांधकामासाठी लागणारा निधी कमी पडत असल्याचे ते म्हणाले. यावेळी संगिता शहा, अनिल चव्हाण, अ‍ॅड. विद्युलता तातेड आदि उपस्थित होते.--इन्फो--अद्ययावत सोयीसुविधाया महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत केवळ इमारत नसून तेथे अद्ययावत अशा सोयीसुविधाही पुरविल्या जाणार आहे. ग्रंथालय, ध्यानधारणा कक्ष, भोजनालय, प्रार्थनागृह, वैद्यकिय उपचार-देखभाल कक्ष, जॉगिंग ट्रॅक, इनडोअर क्रिडांगण, लिफ्ट अशा सर्वच अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्याचा मानस असल्याचे सुराणा यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक