शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात मायलेक ठार

By admin | Updated: March 30, 2016 01:25 IST

नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात मायलेक ठार

 सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर नादुरुस्त खासगी आराम बसला धडक देऊन कार उलटून झालेल्या अपघातात भुसावळ येथील मायलेक जागीच ठार झाले, तर बाप-लेक जखमी झाले. सिन्नरजवळील गुरेवाडी शिवारात लेंडीनाल्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.मूळ भुसावळ, प्रभाकर हॉलजवळ राहणाऱ्या पाटील कुटुंबीयांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात ३०वर्षीय महिलेसह तिचे ४ वर्षांचे बालक ठार झाले आहे. जखमी पाटील पितापुत्रास नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भुसावळ येथील सचिन अशोक पाटील (३५) व त्याची पत्नी निशा हे दाम्पत्य खडकी, पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. सचिन हा खडकी येथील दारूगोळा बनविणाऱ्या कारखान्यात नोकरी करतो, तर त्याची पत्नी मयत निशा या खासगी नोकरी करीत असल्याची माहिती मिळाली. पाटील कुटुंबीय मंगळवारी पहाटे पुण्याहून भुसावळकडे आपल्या होंडा सिटीने (क्रम. एमएच १२ एलडी ७९२९) निघाले होते. सिन्नरजवळील गुरेवाडी शिवारात खासगी आराम बस (एमएच १५ एके १६१२) नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. कारने लेंडी नाल्याजवळील पुलाजवळील दुभाजक व खासगी आराम बसला धडक दिली. त्यानंतर उलटल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या अपघातात निशा सचिन पाटील (३०) व मुलगा सार्थक (४) हे दोघे जागीच ठार झाले, तर सचिन अशोक पाटील (३५) व अशोक किसन पाटील (६०) हे जखमी झाले. जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)सिन्नर पालिका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय खतिले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)