ब्राह्मणगाव : कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहता आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवारपासून ह्यमाझा गाव माझा परिवारह्ण अभियान अंतर्गत दि. १७ ते ३० एप्रिल पर्यंत गावासाठी कडक नियमावली लागू केली असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच किरण अहिरे यांनी केले आहे.शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. सोमवारपासून किराणा दुकान, शेतीशी निगडीत सर्व व्यवसाय व हॉटेल पार्सल सुविधा आदी दुकाने सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत चालू राहतील. सोमवार या दिवशी आठवडे बाजार संपूर्ण बंद राहील. कोणीही हातगाडी अथवा इतरत्र कुठेही बसून भाजीपाला विकताना आढळल्यास अकराशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणशर आहे.मंगळवार ते रविवार भाजीपाला किरकोळ विक्री सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत चालू राहील. गावातील मंदिर, सार्वजनिक जागा, दुकानांच्या पायऱ्यांवर विनाकारण बसू नये, आढळल्यास त्यांचा मोबाईलवर गुप्त पणे फोटो काढून त्यांची यादी पोलीस स्टेशनला देण्यात येऊन कार्यवाही करण्यात येईल.घरातून बाहेर पडताना प्रत्येक नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. विनाकारण कुणीही बाहेरगावी जाणे व गावात फिरू नये तसेच या सर्व नियमांचे दुकानदार व अन्य व्यवसायिक यांनी उल्लघन केल्यास पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल. यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच किरण अहिरे यांनी केले आहे.गावातून दररोज निर्जंतुकीकरणासाठी आवश्यकती फवारणी केली जात असून नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे सांगत कोरोनाला हरवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी ह्यमाझा गाव माझा परिवारह्ण अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.गावातील नागरिकांनी तोंडाला मास्क लावून काळजी घ्यावी. विनाकारण फिरू नये, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे.- किरण अहिरे, सरपंच, ब्राम्हणगाव.
"माझा गाव माझा परिवार" अभियानाची ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीकडून सूरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 16:36 IST
ब्राह्मणगाव : कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहता आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवारपासून ह्यमाझा गाव माझा परिवारह्ण अभियान अंतर्गत दि. १७ ते ३० एप्रिल पर्यंत गावासाठी कडक नियमावली लागू केली असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच किरण अहिरे यांनी केले आहे.
माझा गाव माझा परिवार अभियानाची ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीकडून सूरुवात
ठळक मुद्देशनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद