शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख महाविद्यालयाने जिंकली म्यूट ट्रायल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:55 IST

शहरातील एनबीटी विधी महाविद्यालयात घेण्यात आलेली तेरावी म्यूट ट्रायल अ‍ॅण्ड जजमेंट रायटिंग स्पर्धा अमरावतीच्या पंजाबराव देशमुख महाविद्यालयाने जिंकली आहे. तर नाशिकमधील मविप्र विधी महाविद्यालयाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

नाशिक : शहरातील एनबीटी विधी महाविद्यालयात घेण्यात आलेली तेरावी म्यूट ट्रायल अ‍ॅण्ड जजमेंट रायटिंग स्पर्धा अमरावतीच्या पंजाबराव देशमुख महाविद्यालयाने जिंकली आहे. तर नाशिकमधील मविप्र विधी महाविद्यालयाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.एनबीटी विधी महाविद्यालय व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान यांच्यातर्फे एनबीटी महाविद्यालयात संयुक्तरीत्या तेराव्या राष्टस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचा रविवारी (दि.१३) समारोप झाला असून, या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरणही करण्यात झाले. या स्पर्धेत अमरावतीच्या पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून, या संघात अभिषेक चव्हाण, विशाखा सोनटक्के आणि अभिजित खोत यांचा समावेश होता.यातील अभिजित खोत यांनी सर्वोकृष्ट निकाल लेखणाचे पारितोषिक पटकावले, तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या मविप्र विधी महाविद्यालयाच्या संघात ऋषिकेश पानसरे, आनंद नेटावटे आणि श्रीलेखा भागवत यांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. एम. एस. गोसावी, जिल्हा न्यायधीश एस. सी. खाटी, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी राजीव पाटील, प्रसाद पाटील, अ‍ॅड. जयंत जायभावे आणि अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.या स्पर्धेत एकूण विविध महाविद्यालयांच्या ३० संघांमधून १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील केरळ, तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आदी राज्यांमधून आलेल्या १६ संघांचा समावेश होता.वैयक्तिक पुरस्कारसर्वोकृष्ट निकालपत्र लेखन - अभिजित खोतसर्वोत्कृष्ट मेमोरियल पुरस्कार - सूरज एस. गुंडसर्वोत्कृष्ट साक्षीदार परीक्षा - अभिषेक चौहानसर्वोत्कृष्ट उलटतपासणी - विशाखा सोनटक्के,सर्वोत्कृष्ट युक्तिवाद -आनंद राठोडसर्वोकृष्ट महिला वकील - धुविजा शाहसर्वोकृष्ट पुरुष वकील -नवनीत डोगरासर्वोत्कृष्ट साक्षीदार पुरस्कार - राधिका पुरोहित, दिपेश सक्सेना, प्रतीक्ष बंभेरू, आकाश जाधवसर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार - निशांत बर्डिया, हनी नारायणी, महेश गायकवाड, वैभव वाकचौरे

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी