शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

मृगाच्या अखेर पावसाची ‘हजेरी’

By admin | Updated: June 21, 2016 00:27 IST

मृगाच्या अखेर पावसाची ‘हजेरी’

नाशिक : संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर अगदी अखेरच्या चरणाच्या शेवटच्या दिवशी यंदाच्या मोसमातील मान्सूनने पहिलीच हजेरी सोमवारी (दि.२०) अर्ध्या जिल्ह्यात लावली. त्याआधी तुरळक स्वरूपात जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली.येणार येणार म्हणून बहुचर्चित मान्सून संपूर्ण मृग नक्षत्रात बरसलाच नाही. मागील वर्षाप्रमाणेच यंदाचा जून कोरडा जातो की काय? अशी भीती बळीराजाला लागलेली असतानाच मागील आठवड्यात ढगांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मात्र यंदाच्या मोसमातील मान्सूनने प्रत्येक वेळी बळीराजाला हुलकावणीच दिली होती. रविवारी मात्र दिवसभर पावसाचे वातावरण होते. दुपारनंतर जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी भागांतील काही परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. (पान ७ वर)सायंकाळी निफाड तालुक्यातील पिंपळगावसह अन्य भागांत रस्ते भिजण्यापुरतीच पावसाची हजेरी होती. सोमवारी (दि.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत ०.८ मिलीमीटर अत्यल्प पावसाची नोेंद करण्यात आली. सोमवारी दिवसरभही नाशिक शहरासह अन्य परिसरात पावसाचे वातावरण होते. दुपारनंतर शहरातील मध्य नाशिकसह पंचवटी परिसरात पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली. नाशिकसह, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, भागातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हवामान खात्याकडे दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात अवघ्या ८ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. मृग नक्षत्राच्या अखेरच्या चरणात हजेरी लावणारा मान्सून मंगळवार (दि.२१) दुपारनंतर सुरू होणाऱ्या आद्रा नक्षत्रात किती बरसतो, याकडे जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)