शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात मुस्लीम महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:08 IST

येवला : केंद्राच्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात येवल्यात मुस्लीम महिलांनी बुधवारी मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सकाळी ११ वाजता पट्टनवाली मशिदीपासून आईना मशीद, आझाद चौक, काळा मारुती रोड, गंगा दरवाजा मार्गे हा मुस्लीम महिलांचा मोर्चा येवला तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी हजारो महिलांनी मूक मोर्चा काढत तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकेंद्राच्या निर्णयाला विरोध तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची मागणी

येवला : केंद्राच्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात येवल्यात मुस्लीम महिलांनी बुधवारी मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सकाळी ११ वाजता पट्टनवाली मशिदीपासून आईना मशीद, आझाद चौक, काळा मारुती रोड, गंगा दरवाजा मार्गे हा मुस्लीम महिलांचा मोर्चा येवला तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी हजारो महिलांनी मूक मोर्चा काढत तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची मागणी केली.या मागणीचे निवेदन तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिले. तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय केवळ राजकीय स्वार्थासाठी घेण्यात आलेला असून, तातडीने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी या मोर्चात मुस्लीम महिलांनी केली. आम्ही शरीयतला बाध्य आहोत, शरीयतवर आमचा संपूर्ण विश्वास आहे, ट्रिपल तलाक बिल रद्द करा, शरीयतमध्ये कोणाचा हस्तक्षेप नको, सहानुभूतीच्या नावावर आमचा विश्वासघात केल्याने सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. शरीयतमुळे मुस्लीम महिला पूर्ण सुरक्षित अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात होते.प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार नरेश बहिरम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काजी राफीउद्दीनसह उलेमा धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध दर्शविला आहे. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक रद्दकरण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले असून, या विरोधात हजारो मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता. तीन तलाकचा घेतलेला निर्णय हा शरीयत विरोधात आणि अन्यायकारक असून, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. भारतीय संविधानाने सर्व धर्मांना आपल्या धर्मांनुसार आचरण करण्याचा अधिकार दिलेला असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी सरकारने तीन तलाकचे बिल आणले आहे, हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे हे बिल रद्द करावे, अशी प्रतिक्रि या महिलांनी व्यक्त केली.

तीन तलाक बिल विरोधातील मागण्या...

शरीयत कायद्यामधील सरकारचा हस्तक्षेप मंजूर नाही.तीन तलाक बिल सरकारने रद्द करावे.शरीयत कायद्यावर संपूर्ण विश्वास. 

मोर्चात हजारो महिलांनी उपस्थित राहून सरकार विरोधात निषेध नोंदवला.शैक्षणिक व आर्थिक सुविधांपासून वंचित.