शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जागा संपुष्टात: मुस्लीम कब्रस्तानांमध्ये दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 18:25 IST

कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांसह अन्य मृत्यूचे वाढले प्रमाणमुस्लीमबहुल भागात वाढला मृत्यूदर

नाशिक : शहर व परिसरात मागील दीड ते दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित मुस्लीम रूग्णांसह हृदयविकार व अन्य नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहराच्या जुने नाशिक, वडाळागाव परिसरातील कब्रस्तानांमधील जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाने तत्काळ कन्नमवारपूलालगत व वडाळागावातील शंभरफूटी रस्त्यालगत मुस्लीम दफनभूमीसाठी आरक्षित जागेवर दफनभूमीला परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शहरातील मुस्लीम लोकसंख्या लक्षात घेता अद्याप महापालिकेकडून कोठेही मुस्लीम कब्रस्तानकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मुस्लीम कब्रस्तान हे सर्व खासगी विश्वस्त मंडळांकडून खरेदी केलेल्या जागेतच आहेत. जुन्या नाशकातील रसुलबाग, जहांगीर हे दोन प्रमुख कब्रस्तान शेकडो वर्षे जुने झाले असून त्यामधील जागा अत्यंत भुसभुशीत झाली आहे. तसेच या ठिकाणी अद्याप हजारोवेळा कबरींचे खोदकाम केले गेले आहे. यामुळे कब्रस्तानांमधील जागा आता अपुरी पडू लागली आहे.मागील दीड महिन्यांपासून या दोन्ही कब्रस्तानांसह पीरजादा, काजी खानदानसाठी राखीव असलेल्या खडकाळी व पखालरोडवरील कब्रस्तानांसह वडाळागावातील जामा गौसिया कब्रस्तानमध्ये सुध्दा मोठ्या संख्येने कोरोनाबाधित मुस्लीम मृतदेहांचे दफनविधी करण्यात आले आहेत. कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले.यामुळे या अपात्कालीन परिस्थितीत मुस्लीम दफनविधीसाठी आरक्षित असलेल्या जागेसंदर्भात तत्काळ शासनाने निर्णय घेऊन त्या ठिकाणी कोरोनाबाधित मृतदेह दफनविधीला परवानगी द्यावी, अशी मागणी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, सय्यद तुराबअली शाह संस्थेचे दफनविधी सहायक रिजवान खान, रफिक साबीर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

मुस्लीमबहुल भागात वाढला मृत्यूदरकोरोना आजाराचे संक्रमण जुने नाशिक, पखालरोड, वडाळारोड या भागात सर्वाधिक वाढले. तसेच सध्या वडाळागावातील कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आले असले तरी नैसर्गिक व अन्य कारणांमुळे वडाळ्यातही मागील काही दिवसांपासून सातत्याने मुस्लीमांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती जुने नाशिक भागाची आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMuslimमुस्लीमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस