शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळवणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार

By admin | Updated: July 10, 2016 22:04 IST

१२५ मिमी : पावसामुळे जनजीवन विस्कळीत

कळवण : कळवण शहर व तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी कळवण तालुक्यात १२५ मिमी पाऊस पडला असून दळवट, अभोणा व कनाशी परिमंडळात सर्वाधिक पाऊस पडला असून कळवण, मोकभणगी, नवी बेज या परिमंडळात कमी प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमान मापकावर असून रविवारी तालुक्यात दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. सरासरी १५० मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.कळवण शहरासह तालुक्यात शनिवार व रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले असून बांध फुटले आहे तर रस्ते उखडून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. रविवारी (दि.१०) लग्नतिथी असल्याने कळवण शहर व तालुक्यात लग्नकार्य संयोजकांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. सलग दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले होते. आजच्या लग्नतिथीमुळे शहरातील मंगल कार्यालय व लॉन्स परिसरातील रस्त्यावर पावसामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने अनेक मान्यवरांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.कळवण, अभोणा, कनाशी, दळवट, जयदर, पाळे, नवी बेज, जुनी बेज, भेंडी, शिरसमणी, ओतूर, कुंडाणे, भुसणी, जिरवाडे, बापखेडा, विरशेत, कुमसाडी, भांडणे, शिंगाशी, वरखेडा, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, मोकभणगी, दरेभणगी, खेडगाव, दह्याणे दिगर, खिराड, देसराणे, धनेर, गणोरे, गोबापूर, नांदुरी, कळमथे, निवाणे, नाकोडे, मानूर, शिरसमणी आदि तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून तालुक्यात पावसाची दिवसभर रिमझिम सुरू होती. आदिवासी पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प तसेच धनोली, भेगू, मळगाव चिंचपाडा, जामलेवणी, गोबापूर, मार्कंडपिंप्री, खिराड येथील लघुजलसंचयाची पाणी पातळी वाढत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. केवळ ढगाळ वातावरण होते. मात्र, शनिवार सकाळपासून कळवण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सात वाजेपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कळवण तालुक्यात शनिवारी मंडळनिहाय पडलेला पाऊस- कळवण-२५.०, नवी बेज- १३.०, अभोणा- ५६.०, कनाशी- ५९.४, दळवट- ५७.८, मोकभणगी- १२.० तालुक्यात पर्जन्यमापकांच्या सहा परिमंडळात असलेल्या यंत्रकाच्या सूचीवरून एकूण ५४३ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून सरासरी १२५ मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)